(पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक प्रबोधन आणि विधायक उपक्रमांना चालना देण्याचे काम शहरातील गणेश मंडळांकडून केले जात आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविणाऱ्या मंडळांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त (Ganeshotsav 2026)केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात उल्लेखनीय व विधायक कार्य करणाऱ्या विविध गणेश मंडळांचा गौरव करण्यात(Ganeshotsav 2026) आला.
बाबर म्हणाल्या, “गणेशोत्सव हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरावे. मंडळांनी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे उपक्रम राबविण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास गणेशोत्सवाची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ (Ganeshotsav 2026)होईल.”
यावेळी आमदार हेमंत रासने, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त मंदार देव महाराज यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित (Ganeshotsav 2026)होते.
पारितोषिकप्राप्त गणेश मंडळांचे अभिनंदन करत बाबर यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, संस्कृती आणि समाजहिताची भावना अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त (Ganeshotsav 2026)केली.

