Home मनोरंजन Ahir Suvarnakar Samaj:अहिर सुवर्णकार समाजात रंगला सुरांचा सोहळा; “ऐ जिंदगी, गले लगा ले” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ahir Suvarnakar Samaj:अहिर सुवर्णकार समाजात रंगला सुरांचा सोहळा; “ऐ जिंदगी, गले लगा ले” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील अहिर सुवर्णकार समाजाच्या सुवर्ण पिंपळ संगीत मंचातर्फे आयोजित “ऐ जिंदगी, गले लगा ले” हिंदी गीतांच्या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

by Admin
Spread the love

पुणे / पिंपरी-चिंचवड : अहिर सुवर्णकार समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “सुवर्ण पिंपळ संगीत मंच”च्या वतीने हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम “ऐ जिंदगी, गले लगा ले” उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार पेठेतील समाजाच्या कार्यालयात अर्थात सोनार वाड्यात झालेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Ahir Suvarnakar Samaj) मिळाला.

 

या विशेष मैफलीत तब्बल ३० गायक-गायिकांनी सहभाग घेत हिंदी गीतांची मनमोहक मेजवानी रसिकांना दिली. कार्यक्रमाची सुरुवात सौ. स्नेहल बाविस्कर यांच्या गणेश वंदनेने झाली, तर श्री. मिलिंद दुसाने यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रोत्यांनी प्रत्येक सादरीकरणाला भरभरून दाद (Ahir Suvarnakar Samaj)दिली.

 

जन्मत: दृष्टिहीन असलेल्या प्रसाद मोरे यांनी सादर केलेल्या “जाने कहां गये वो दिन” या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच “जिंदगी मिलके बिताएंगे” या समारोप गीताने कार्यक्रमाची सांगता रंगतदार वातावरणात (Ahir Suvarnakar Samaj)झाली.

अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी गायकांचे कौतुक करत भविष्यात अशा प्रत्येक कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. आयोजक अॅड. जगदीश विसपुते, राजन वाघ, सुभाष चव्हाण आणि विजय वडनेरे यांनी समाजाच्या सहभागातून पुढेही असे सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतील, असे (Ahir Suvarnakar Samaj)सांगितले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00