Home गुन्हे Chikhali Vehicle Theft :चिखली पोलिसांची मोठी कारवाई! वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ गुन्हे उघड, ५ वाहने जप्त

Chikhali Vehicle Theft :चिखली पोलिसांची मोठी कारवाई! वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ गुन्हे उघड, ५ वाहने जप्त

चिखली पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. दोन आरोपी अटकेत असून पाच वाहनचोरी, दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. सुमारे २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

by Admin
Spread the love

(प्रतिनिधी) :चिखली पोलिसांनी वाहनचोरी करून त्याच वाहनांचा वापर घरफोड्यांसाठी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी राज उर्फ ढेक्या संतोष बापडेकर (वय २३, रा. शिवपार्वती हौसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली) आणि शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत वाहनचोरीचे पाच आणि घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस (Chikhali Vehicle Theft) आले.

आरोपींकडून बुलेट (एमएच-४३-बीटी-०८१४), स्प्लेंडर (एमएच-१४-जेडडब्ल्यू-१०५४), होंडा शाईन (एमएच-१४-एलके-८८६३), सुझुकी ॲक्सेस (एमएच-१४-जीएस-२०७६) या चार दुचाकींसह एमएच-१४-सीएचएम-१०३२ क्रमांकाची ऑटो रिक्षा असा सुमारे २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासात राज संतोष बापडेकर याच्याविरुद्ध यापूर्वी वाहनचोरीचे १२ गुन्हे दाखल असल्याचे, तर शंकरसिंग समंदरसिंग टाक याच्याविरुद्ध हडपसर, मांजरी, येरवडा व निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत चार गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण तसेच किरण काटकर, विनोद व्होनमाने, प्रविण भोमाळे, सुरज सुतार, अरुण सावळे, भरत माने, संतोष भालेराव, अजय गायकवाड, कंठय्या स्वामी, रोहित मोरे, अनिल राखे आणि संतोष भोर यांनी सहभाग (Chikhali Vehicle Theft)घेतला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00