Home गुन्हे PCMC Crime: महापालिकेत नोकरीचे आमिष; पाच जणांची १.१४ लाखांची फसवणूक, आरोपीला अटक

PCMC Crime: महापालिकेत नोकरीचे आमिष; पाच जणांची १.१४ लाखांची फसवणूक, आरोपीला अटक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे देत पाच जणांची १.१४ लाखांची फसवणूक. आरोपीला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी 13 सप्टेंबर 2026): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे देत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. प्रतीक राजेश धायींजे (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. अकलूज, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव (PCMC Crime)आहे.

 

पाच जणांची १ लाख १४ हजार ११२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा रजिस्टर क्रमांक ५६६/२०२६(PCMC Crime) आहे.

 

खंडणीविरोधी पथकाला १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रतीक धायींजे याने अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे समोर आले. पोलिसांनी पीडितांशी संपर्क साधून चौकशी केली असता, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नोकरीसाठी बनावट कॉल लेटर देऊन पाच जणांकडून पैसे उकळल्याचे उघडकीस (PCMC Crime)आले.

 

दरम्यान, आरोपीची चौकशी केली असता, त्याने ‘म्हाडा’मध्ये स्वस्त घर मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचेही निष्पन्न झाले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रजिस्टर क्रमांक ३३/२०२५ अन्वये यापूर्वीच गुन्हा दाखल( PCMC Crime)आहे.

 

आरोपी भोसरीतील धावडे वस्ती परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले (PCMC Crime)आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, किरण जाधव आणि किशोर कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई (PCMC Crime)केली.

 

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना शासकीय नोकरी किंवा स्वस्त घर मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन केले(PCMC Crime) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00