20
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी १ मार्चपासून ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत करावरील शास्ती (दंड) रकमेवर तब्बल ९० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. वाढती थकबाकी वसूल करणे आणि नागरिकांवरील दंडाचा भार कमी करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट (PCMC Abhay Yojana) केले.
पालिकेने सांगितले की, सवलत केवळ दंडाच्या रकमेवर लागू असून मूळ मालमत्ता कर पूर्ण भरणे बंधनकारक राहील. योजनेच्या सुरुवातीच्या कालावधीत जास्तीत जास्त सवलत मिळणार असून पुढील टप्प्यात सवलतीचे प्रमाण कमी होऊ शकते. योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई टाळली जाणार(PCMC Abhay Yojana) आहे.
कर भरण्यासाठी १६ विभागीय कार्यालयांमध्ये विशेष खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध(PCMC Abhay Yojana)आहे.
शहराच्या विकासकामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख महसूल स्रोत असल्याने नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन थकीत कर भरावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. मुदत संपल्यानंतर थकबाकीदारांवर कडक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला(PCMC Abhay Yojana)आहे.
