चिंचवड, दि. १७ : पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा १३ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात (Pratibha Junior College)आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित (Pratibha Junior College) होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून कॉलेजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी कष्ट, सातत्य आणि ध्येयनिष्ठेच्या बळावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी (Pratibha Junior College)दिला
विज्ञान शाखेच्या समन्वयिका डॉ. सुनिता पटनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या १३ वर्षांत संस्थेने दिलेल्या संधी, विश्वास आणि प्रोत्साहनामुळे आपली शैक्षणिक वाटचाल घडली असल्याचे सांगितले. त्यांच्या भावनिक मनोगताने उपस्थितांचे लक्ष वेधून (Pratibha Junior College)घेतले
संस्थेचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा यांनी आपल्या भाषणात प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्यनिष्ठा, नेतृत्वगुण, धाडस आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या विद्यमान व माजी प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव )Pratibha Junior College)केला
विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धेच्या युगात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वी व आदर्श नागरिक बनावे, तसेच पालकांनी आपल्या मुलांसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाच्या भावी वाटचालीसाठीही त्यांनी शुभेच्छा (Pratibha Junior college) दिल्या
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आणि विद्यार्थी-केंद्रित सुविधा यांवर प्रकाश टाकत प्राचार्या व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन (Pratibha Junior College) केले.
प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहा भाटिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी (Pratibha Junior College)केले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रा. जास्मिन फरास, प्रा. वैशाली देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित (Pratibha Junior College)होते.
१३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत प्रतिभा ज्युनिअर कॉलेज आता १४व्या वर्षात पदार्पण करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात (Pratibha Junior College)आला .
