Home गुन्हे Moshi Depot Accident:मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटना,दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; रिपब्लिकन सेनेची आयुक्तांकडे मागणी

Moshi Depot Accident:मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटना,दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; रिपब्लिकन सेनेची आयुक्तांकडे मागणी

मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन सेनेचे गुलाब पानपाटील यांची पिंपरी महापालिका आयुक्तांकडे मागणी.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी )मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळून ९ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली (Moshi Depot Accident)आहे.

 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पानपाटील यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या प्रकल्पातील नवीन इमारत कोसळणे हे बांधकामाच्या दर्जावर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. या प्रकरणाची निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषी बिल्डर, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर, संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) कठोर कारवाई करण्यात (Moshi Depot Acciden)tयावी.

 

**रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख मागण्या:**

१. स्वतंत्र शासकीय तज्ज्ञ समितीकडून दुर्घटनाग्रस्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट व फॉरेन्सिक तपासणी करावी.

२. मंजूर नकाशे, डिझाईन आणि वापरलेल्या साहित्याच्या दर्जाची कसून तपासणी व्हावी.

३. दोषी आढळणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर तातडीने फौजदारी आणि विभागीय कारवाई करावी.

४. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी चौकशी अहवाल सार्वजनिक(Moshi Depot Accident)करावा.

हा केवळ अपघात नसून निष्काळजीपणाचा ढळढळीत नमुना आहे. त्यामुळे दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन सेनेने केली (Moshi Depot Accident)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00