Home क्रीडा Manav Shinde Shoto :पिंपरी-चिंचवडचा मानव शिंदे जागतिक रंगमंचावर; Team Apex Gaming चे World Cup मधील आव्हान कायम

Manav Shinde Shoto :पिंपरी-चिंचवडचा मानव शिंदे जागतिक रंगमंचावर; Team Apex Gaming चे World Cup मधील आव्हान कायम

पिंपरी-चिंचवडचा युवा ई-स्पोर्ट्सपटू मानव शिंदे (TAG Shoto) Free Fire Esports World Cup 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. Team Apex Gaming चे आव्हान अद्याप कायम असून दुसऱ्या दिवसाच्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवडच्या युवा ई-स्पोर्ट्सपटू मानव शिंदे (TAG Shoto) याच्यावर संपूर्ण शहराच्या नजरा खिळल्या आहेत. Free Fire Esports World Cup 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Team Apex Gaming कडून खेळणाऱ्या मानवने जागतिक स्तरावर आपली छाप पाडण्यास सुरुवात केली असून, स्पर्धेतील संघाचे आव्हान अद्याप कायम (Manav Shinde Shoto)आहे.

 

स्पर्धेच्या ग्रुप स्टेजच्या पहिल्या दिवसाअखेर Team Apex Gaming ने सहा सामने पूर्ण करत ४३ गुणांची कमाई केली आहे. अधिकृत गुणतालिकेनुसार संघ सध्या दहाव्या स्थानावर असून पुढील फेरी गाठण्याची संधी कायम(Manav Shinde Shoto) आहे.

 

स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक गटातील संघ १२ सामने खेळणार आहेत. त्यापैकी उर्वरित सहा सामने गुरुवार (१६ जुलै) रोजी खेळवले जाणार असून त्यानंतर अंतिम गुणतालिका निश्चित होईल. अव्वल चार संघ थेट ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करतील, तर पाचव्या ते दहाव्या क्रमांकावरील संघांना ‘सर्व्हायव्हल स्टेज’मधून आणखी एक संधी मिळणार(Manav Shinde Shoto) आहे.

 

दरम्यान, Team Apex Gaming कडून खेळणाऱ्या मानव शिंदेच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ई-स्पोर्ट्स पेजेस आणि चाहत्यांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे. मात्र, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या वैयक्तिक आकडेवारीची अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने ती जाहीर करण्यात आलेली (Manav Shinde Shoto)नाही.

पिंपरी-चिंचवडमधील तरुणाईसाठी मानव शिंदे हा प्रेरणादायी चेहरा ठरत आहे. पारंपरिक खेळांबरोबरच ई-स्पोर्ट्समध्येही भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, याचे उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिले जात (Manav Shinde Shoto)आहे.

 

गुरुवार, १६ जुलै रोजी होणाऱ्या सामन्यांमध्ये Team Apex Gaming च्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांसह पिंपरी-चिंचवडकरांचेही विशेष लक्ष लागले आहे. याच दिवशी Group B मधील भारताचे S8UL Esports आणि Total Gaming Esports यांचेही सामने रंगणार असून, भारतातील कोणते संघ पुढील फेरी गाठतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली (Manav Shinde Shoto)आहे.

 

आता सर्वांच्या नजरा मानव शिंदे आणि Team Apex Gaming च्या दुसऱ्या दिवसातील कामगिरीवर खिळल्या असून, पिंपरी-चिंचवडचा हा युवा खेळाडू जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा अधिक उंचावेल, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत (Manav Shinde Shoto) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00