(विवेक कुलकर्णी ): पॅरिस येथे सुरू असलेल्या Esports World Cup (EWC) Free Fire 2026 स्पर्धेत भारताच्या Team Apex Gaming ने दमदार खेळ करत ग्रँड फायनलमध्ये धडक मारली आहे. सुमारे 8.5 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेच्या या जागतिक स्पर्धेत संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत जगातील अव्वल 12 संघांमध्ये स्थान निश्चित केले (EWC Free Fire 2026)आहे.
या यशामध्ये पिंपरी-चिंचवडच्या निगडीतील मानव शैलेश शिंदे (इन-गेम नाव : Shoto) याने मोलाची भूमिका बजावली. निर्णायक सामन्यांमध्ये त्याने केलेल्या अचूक आक्रमक खेळी, महत्त्वपूर्ण एलिमिनेशन्स (Kills) आणि संघासाठी मिळवून दिलेल्या मौल्यवान गुणांमुळे Team Apex Gaming ने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. त्याच्या खेळाचे जगभरातील ई-स्पोर्ट्स चाहत्यांकडून कौतुक होत (EWC Free Fire 2026)आहे.
मानव हा निगडी येथील उद्योजक शैलेश पांडुरंग शिंदे यांचा मुलगा असून त्याची आई माधवी शिंदे या देखील उद्योजिका आहेत. आजोबा पांडुरंग शिंदे हेही यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. सुखवस्तू कुटुंबात वाढूनही मानवने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ई-स्पोर्ट्समध्ये वेगळी ओळख निर्माण केली (EWC Free Fire 2026)आहे.
सुरुवातीला पालकांना या खेळाबद्दल विशेष माहिती किंवा रस नव्हता. मात्र मानवची चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पाहून त्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. आज त्याचे संपूर्ण कुटुंब पॅरिसमध्ये उपस्थित राहून त्याला प्रोत्साहन देत आहे. कुटुंबाच्या या पाठबळामुळे मानवचा आत्मविश्वास अधिकच उंचावला असून त्याने जागतिक व्यासपीठावर प्रभावी खेळ साकारला (EWC Free Fire 2026)आहे.
स्पर्धेची थोडक्यात माहिती
Esports World Cup Free Fire 2026 स्पर्धेत जगभरातील 24 संघ सहभागी झाले आहेत. गट फेरीनंतर थेट पात्र ठरू न शकलेल्या संघांना Survival Stage खेळावी लागली. या फेरीत 12 संघांमधून अव्वल चार संघांनी ग्रँड फायनलमध्ये प्रवेश मिळवला. Team Apex Gaming ने 165 गुणांसह दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत ‘Champion Rush’ या विशेष स्वरूपात विजेतेपदाचा निर्णय होणार (EWC Free Fire 2026)आहे.
मानव ‘Shoto’ शिंदेच्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याच्या नावाची देशभरात चर्चा रंगली आहे. त्याच्या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचीही आंतरराष्ट्रीय ई-स्पोर्ट्स विश्वात वेगळी ओळख निर्माण होत (EWC Free Fire 2026)आहे.
माझंपिंपरीचिंचवड.इन परिवार आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मानव शिंदे व Team Apex Gaming ला ग्रँड फायनलसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भारतीय ई-स्पोर्ट्स इतिहासात नवे सुवर्णपान लिहिण्याची संधी त्यांच्या समोर असून संपूर्ण देशाच्या नजरा आता त्यांच्या अंतिम लढतीकडे लागल्या (EWC Free Fire 2026) आहेत.

