Home महाराष्ट्र PCMC Shiv Jayanti :पिंपरी चिंचवडमध्ये शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात संपन्न

PCMC Shiv Jayanti :पिंपरी चिंचवडमध्ये शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवडमध्ये शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात संपन्न

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते विजय महाराज तनपुरे यांनी प्रभावी मार्गदर्शन( PCMC Shiv Jayanti) केले.

शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) आयोजित या कार्यक्रमात विजय महाराज तनपुरे यांनी “शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा तरुण” या विषयावर ओजस्वी व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. आपल्या भाषणात त्यांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील ध्येयधैर्य, शौर्य, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि लोकाभिमुख राज्यकारभार यांचे सखोल विश्लेषण केले. शिवरायांनी संकटांना न घाबरता न्याय, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या बळावर उभे केलेले स्वराज्य आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद( PCMC Shiv Jayanti) केले.

यावेळी नगरसदस्य शालिनीताई गुजर, विशेष कार्यअधिकारी किरण गायकवाड, निवेदक किशोर केदारी, शिवव्याख्याते अनिल वडमुले, करण तुपे, संकेत जोशी,शंकर जगताप,काका माऊली आदी मान्यवर उपस्थित होते

 

“शिवचरित्र हे केवळ इतिहासातील घटना नसून ते जीवनाला दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. तरुणांनी शिवरायांच्या विचारांतून कर्तृत्व, शिस्त, धैर्य आणि समाजाभिमुखता आत्मसात केली तर देश अधिक सक्षम बनेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. आजच्या स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक काळात सकारात्मक दृष्टिकोन, नेतृत्वगुण आणि कर्तव्यनिष्ठा विकसित करण्यासाठी शिवविचारांची गरज अधोरेखित करत त्यांनी तरुणांना स्वप्न पाहण्याबरोबरच ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याचे आवाहन ( PCMC Shiv Jayanti) केले.

कार्यक्रमास महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचे कौतुक ( PCMC Shiv Jayanti) केले.

कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभागाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये शिवविचारांविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त( PCMC Shiv Jayanti) केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00