Home महाराष्ट्र MLA Shankar Jagtap :पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक

MLA Shankar Jagtap :पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक

RDSS अंतर्गत ११०० कोटींच्या आराखड्याला गती; ताथवडे उपकेंद्र प्रकरणी कारवाईचे संकेत

by Admin
Spread the love

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी :पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वीज समस्यांबाबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. शहराच्या वाढत्या लोकसंख्या व औद्योगिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा सुदृढ करण्यासाठी पुनर्गठित वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सुमारे ११०० कोटी रुपयांचा आराखडा गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी (MLA Shankar Jagtap)दिली.

 

या निधीतून पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद होणार असून, भोसरी व पिंपरी विभागातील पायाभूत सुविधा उभारणी, भूमिगत केबलिंग, नवीन फीडर, ट्रान्सफॉर्मर व उपकेंद्रांची उभारणी यास प्राधान्य दिले जाणार (MLA Shankar Jagtap) आहे.

ताथवडे येथील अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्राचा प्रस्ताव दीड वर्षांपासून प्रलंबित असल्याबद्दल आमदार जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर ऊर्जा राज्यमंत्र्यांनी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच पुण्यात सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट(MLA Shankar Jagtap) केले.

 

वाढत्या मागणीचा प्रश्न

रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, ताथवडे, पिंपळे सौदागर आदी भागांत आयटी पार्क आणि निवासी वसाहती वाढल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारांमुळे नागरिक व उद्योग क्षेत्र त्रस्त असल्याचे आमदार जगताप यांनी सभागृहात नमूद(MLA Shankar Jagtap) केले.

मोशी, चऱ्होली व ताथवडे येथे नवीन उपकेंद्रे उभारणे, काळेवाडी-हिंजवडी-बिजलीनगर शाखांचे विभाजन, तसेच भोसरीतील ‘सेंच्युरी इंका’ उपकेंद्रात अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी त्यांनी (MLA Shankar Jagtap)केली.

दिलासा देणारा निर्णय

RDSS आणि इतर योजनांतून मंजूर होणाऱ्या निधीमुळे पिंपरी-चिंचवडमधील वीज पुरवठ्याची गुणवत्ता व सातत्य सुधारण्यास मदत होणार आहे. प्रलंबित प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळवून नागरिकांना अखंड वीज पुरवठा देणे ही प्राथमिकता असल्याचे आमदार जगताप यांनी (MLA Shankar Jagtap)सांगितले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00