पिंपरी-चिंचवड : शहराच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना आज घडली. पिंपरी चिंचवड (PCMC) मनपाच्या अर्थसंकल्प इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या अनुपस्थितीत सादर करण्यात आला. प्रभारी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या सूचनेमुळे पत्रकारांनी सभागृह सोडण्याचा निर्णय घेतल्याने हा अभूतपूर्व प्रकार (PCMC Budget 2026) घडला.
नेमकं काय घडलं?
स्थायी समितीच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पत्रकार उपस्थित होते. मात्र, पत्रकारांनी मागील बाजूस जाऊन बसावे आणि त्या जागी अधिकाऱ्यांना बसू द्यावे, अशी सूचना प्रभारी आयुक्तांकडून करण्यात आली. ही सूचना पत्रकारांनी अनुचित असल्याचे सांगत विरोध दर्शविला.विशेष म्हणजे, याच सभागृहात नुकतीच स्थायी समिती अध्यक्षपदी अभिषेक बारणे यांची निवड झाली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते विनापरवाना सभागृहात उपस्थित होते. त्या वेळी नियमभंगाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पत्रकारांनी आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह (PCMC Budget 2026) उपस्थित केले.
वाद, बहिष्कार आणि अभूतपूर्व निर्णय
“अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मी पत्रकारांशी बोलेन,” असे प्रभारी आयुक्तांनी सांगितल्यावर पत्रकारांनी याचा अर्थ अप्रत्यक्षपणे बाहेर जाण्याची सूचना असा घेतला. त्यानंतर पत्रकार व आयुक्त यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक (PCMC Budget 2026)झाली.
पत्रकारांनी सवाल केला की,
कार्यकर्ते नियम मोडून सभागृहात आले तेव्हा प्रशासन मौन का होते?
पत्रकारांच्या बाबतीतच नियमांचा कडक अवलंब का?
या प्रश्नांवर आयुक्त समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असा दावा पत्रकारांनी केला. परिणामी, सर्व पत्रकारांनी एकत्रितपणे सभागृह सोडत अर्थसंकल्पीय प्रक्रियेवर बहिष्कार (PCMC Budget 2026)टाकला.
इतिहासात पहिल्यांदाच…
PCMC चा अर्थसंकल्प पत्रकारांच्या उपस्थितीत सादर होण्याची परंपरा होती. मात्र, आज प्रथमच माध्यम प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या घटनेमुळे पारदर्शकता, माध्यम स्वातंत्र्य आणि प्रशासनाच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले(PCMC Budget 2026) आहेत .
पुढे काय?
पत्रकारांनी प्रभारी आयुक्तांच्या पत्रकार परिषदेलाही बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासन आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात (PCMC Budget 2026)आहे.
शहरातील राजकीय वर्तुळात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून, प्रशासनाने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची मागणी होत (PCMC Budget 2026)आहे.
