Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Mayor Election :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा

PCMC Mayor Election :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभा. स्थायी समिती व 5 विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती होणार. संपूर्ण माहिती वाचा.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २४ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सभेत स्थायी समितीसह विविध ५ विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी (PCMC Mayor Election )दिली.याच निमित्ताने आगामी प्रजासत्ताक दिनाच्या  पूर्वसंध्येला महापालिका इमारतीत आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, या विशेष सभेत महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे काम पाहणार (PCMC Mayor Election)आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेणे आवश्यक असल्याने, त्यानुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर, उपमहापौर यांच्यासह स्थायी समिती व विविध ५ विशेष समित्यांचे सदस्य नियुक्त करण्यात येणार (PCMC Mayor Election)आहेत.

नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती

महापौर व उपमहापौर पदासाठीचे नामनिर्देशन पत्रांचे छापील फॉर्म्स महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे. विहित वेळेतच नामनिर्देशन पत्र स्वीकारली जातील, अशी माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी(PCMC Mayor Election) दिली.

स्थायी व विशेष समित्यांवरील सदस्यसंख्या

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार,स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.तसेच ५ विशेष समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची निवड करण्यात येणार (PCMC Mayor Election)आहे.

विशेष समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती करताना पक्ष किंवा गटांच्या संख्याबळानुसार प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीवर किमान ७५ टक्के सदस्य महिला असणार असल्याचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी स्पष्ट (PCMC Mayor Election)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00