Home महाराष्ट्र HSRP Number Plate:HSRP नंबरप्लेट नसेल तर मोठी कारवाई | वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय

HSRP Number Plate:HSRP नंबरप्लेट नसेल तर मोठी कारवाई | वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय

राज्यात HSRP नंबरप्लेट बंधनकारक असतानाही अनेक वाहनांवर ती नसल्याचे समोर आले आहे. आचारसंहिता संपताच विशेष तपासणी मोहीम राबवून ₹1,000 ते ₹10,000 दंडात्मक कारवाई होणार.

by Admin
Spread the love

पुणे/मुंबई : राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, High Security Registration Plate (HSRP) नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असतानाही अद्याप मोठ्या प्रमाणावर वाहनांवर ही नंबरप्लेट नसल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून कडक कारवाईची तयारी सुरू करण्यात आली (HSRP Number Plate) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो वाहनधारकांनी अजूनही HSRP नंबरप्लेट बसवलेली नाही. सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे प्रत्यक्ष कारवाईला तात्पुरता विलंब होत असला, तरी आचारसंहिता संपल्यानंतर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार (HSRP Number Plate)आहे.

या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर वाहनांची सखोल तपासणी केली जाणार असून, HSRP नंबरप्लेट नसलेल्या वाहनधारकांवर ₹1,000 ते ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत परिवहन विभागाकडून देण्यात आले (HSRP Number Plate)आहेत.

HSRP नंबरप्लेटमुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते, बनावट नंबरप्लेटवर आळा बसतो तसेच गुन्हेगारी तपास अधिक प्रभावीपणे करता येतो. यामुळेच ही नंबरप्लेट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आली (HSRP Number Plate)आहे.

परिवहन विभागाने वाहनधारकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप HSRP नंबरप्लेट बसवलेली नाही, त्यांनी संभाव्य दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने अधिकृत केंद्रावरून ही नंबरप्लेट बसवून(HSRP Number Plate) घ्यावी.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00