पिंपरी | भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा दोन दिवसीय भव्य प्रशिक्षण वर्ग नुकताच लोणावळा येथे उत्साहात पार पडला. या निवासी प्रशिक्षण वर्गात पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती असलेली बांधिलकी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कार्यकर्ता विकास या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात (Ravindra Chavan) आले.
या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील विविध प्रमुख नेत्यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांना १२ विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या महाअभियानात १५० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग(Ravindra Chavan) नोंदविला.
भव्य उद्घाटन आणि प्रदर्शनीचे आकर्षण
प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाची माहिती देणारी भव्य प्रदर्शनी उभारण्यात आली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात (Ravindra Chavan)आले.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी “शतप्रतिशत भाजपा” हा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. देशात हजारो राजकीय पक्ष असले तरी सातत्याने कार्यरत राहणारा पक्ष म्हणजे भाजपा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा सुवर्णकाळ सुरू असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी नागरिकांना “हवेहवेसे” वाटतील अशी कामे करावीत, असा सल्ला त्यांनी (Ravindra Chavan)दिला.
सार्वजनिक जीवनात वावरताना पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची खबरदारी घेणे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. संघटनात्मक शिस्त, परस्पर सन्मान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देणे हे पक्षाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट (Ravindra Chavan)केले.
या उद्घाटन प्रसंगी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा प्रभारी ॲड. भरत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, संगठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित (Ravindra Chavan) होते.
पहिल्या दिवशी वैचारिक आणि संघटनात्मक सत्रे
उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी सात विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी ‘व्यावहारिक सत्र’ घेत कामकाजाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर मार्गदर्शन (Ravindra Chavan) केले.
विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी ‘कार्य विस्तार’, तर प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी ‘मीडिया व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. आमदार संजय केळकर यांनी भाजपाची ‘कार्यपद्धती’ स्पष्ट (Ravindra Chavan)केली.
यानंतर विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी ‘देशासमोरील आव्हाने’ या विषयावर भाष्य केले. दिवसाच्या शेवटच्या सत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी ‘कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव’ या विषयावर प्रभावी मांडणी (Ravindra Chavan)केली.
दुसऱ्या दिवशी तंत्रज्ञान, इतिहास आणि बूथ व्यवस्थापनावर भर
प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ‘योगा व व्यायाम’ सत्राने झाली. हे सत्र माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी (Ravindra Chavan)घेतले.
यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय संवादक योगेश बाचल यांनी ‘बूथ व्यवस्थापन, सहा स्थायी कार्यक्रम, मन की बात आणि SIR’ या विषयांवर मार्गदर्शन केले. आमदार सुनील कर्जतकर यांनी ‘भाजपा इतिहास’ उलगडून (Ravindra Chavan)सांगितला.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारच्या योजना, अंत्योदय आणि सरकारच्या कामगिरीवर भाष्य केले. प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ‘सोशल मीडिया, AI, नमो ॲप आणि सरळ ॲप’ या विषयांवर डिजिटल युगातील कार्यपद्धती समजावून (Ravindra Chavan)सांगितली.
अंतिम सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी ‘विचार परिवार’ या विषयावर कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा (Ravindra Chavan)दिली.
नियोजनबद्ध आयोजनाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे जिल्हा प्रमुख व संगठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. त्यांना मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, भूषण जोशी, अमेय देशपांडे, सचिन राऊत, राजाभाऊ मासूळकर आणि अजित कुलथे यांनी सहकार्य (Ravindra Chavan) केले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियानामुळे कार्यकर्त्यांना वैचारिक बळ मिळाले असून संघटना अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि गतिमान होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त (Ravindra Chavan)केला.
