Home आरोग्य Heart Transplant Pune:हृदय प्रत्यारोपणासाठी मदतीचे आवाहन | १० वर्षीय मित उतेकरसाठी तातडीची आर्थिक मदत आवश्यक

Heart Transplant Pune:हृदय प्रत्यारोपणासाठी मदतीचे आवाहन | १० वर्षीय मित उतेकरसाठी तातडीची आर्थिक मदत आवश्यक

पिंपरी-चिंचवडमधील १० वर्षीय मित उतेकर गंभीर हृदयविकाराशी झुंज देत असून हृदय प्रत्यारोपणासाठी तातडीची आर्थिक मदत आवश्यक आहे. कृपया मदत करा.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : एका निरागस, हुशार आणि स्वप्नाळू बालकाच्या जीवनासाठी सध्या समाजाच्या मदतीची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. चिंचवड परिसरातील १० वर्षीय चि. मित पंडरीनाथ उतेकर हा गंभीर हृदयविकाराशी झुंज देत असून त्याच्यावर तातडीने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Heart Transplant) करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले (Heart Transplant Pune) आहे.

 

मित हा इयत्ता ४ थीत शिक्षण घेत असून तो ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. खेळकर, मित्रांसोबत रमणारा आणि मोठं होऊन चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याची स्वप्न पाहणारा मित आज मात्र जीवघेण्या आजाराशी सामना करत (Heart Transplant Pune)आहे.

वैद्यकीय स्थिती

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मितसाठी हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. त्याची नोंद ZTCC, पुणे येथे अधिकृत प्रतीक्षा यादीत २८ मार्च २०२६ रोजी करण्यात आली असून त्याची स्थिती Confirmed Waitlist अशी(Heart Transplant Pune) आहे.ही शस्त्रक्रिया Ruby Hall Clinic, Pune येथे होणार(Heart Transplant Pune) आहे.

आर्थिक अडचण

या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेसाठी सुमारे ₹२८ लाख खर्च अपेक्षित असून शस्त्रक्रियेनंतरचा खर्चही ₹५ ते ₹१० लाखांपर्यंत जाऊ शकतो. मितच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी असल्यामुळे एवढा मोठा खर्च करणे त्यांच्यासाठी अशक्य झाले(Heart Transplant Pune) आहे.

मदतीचे आवाहन

मितला केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर समाजाच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची गरज आहे.

“आपली छोटीशी मदतही एका निरागस जीवासाठी नवसंजीवनी ठरू (Heart Transplant Pune) शकते.”

देणगी तपशील

 

खातेदार नाव: पंडरीनाथ आत्माराम उतेकर

 

बँक: Bank of Baroda

 

खाते क्रमांक: 80110100009879

 

IFSC: BARB0VJKIWA

 

UPI: 9922227106-2@axl

 

 

📞 संपर्क: 9922227106

 

 

 

पारदर्शकता व विश्वास

 

ZTCC अधिकृत नोंदणीचा पुरावा उपलब्ध

 

हॉस्पिटल अंदाजपत्रक उपलब्ध

 

देणगी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाणार

 

या बातमीला जास्तीत जास्त शेअर करून मितपर्यंत मदतीचा हात पोहोचवा.

मनापासून (Heart Transplant Pune) धन्यवाद…!

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00