Home प्रेरणा / यशकथा Maharashtra Kesari 2026 : हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडचा 4-2 ने पराभव

Maharashtra Kesari 2026 : हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडचा 4-2 ने पराभव

महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने महेंद्र गायकवाडचा 4-2 ने पराभव करून सातवा डबल महाराष्ट्र केसरी किताब जिंकला.

by Admin
Spread the love

पुणे (वाघोली) : राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने दमदार कामगिरी करत महेंद्र गायकवाड याचा 4-2 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह सदगीरने ‘डबल महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावत इतिहास रचला असून तो हा मान मिळवणारा सातवा मल्ल ठरला (Maharashtra Kesari 2026 )आहे.

स्पर्धेची अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या हाफमध्ये महेंद्र गायकवाडने 1 गुण घेत आघाडी मिळवली. मात्र, हर्षवर्धन सदगीरने लगेच प्रत्युत्तर देत एक गुण मिळवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत (Maharashtra Kesari 2026 )ठेवला.

दुसऱ्या हाफमध्ये सामन्याने रंगत घेतली. गायकवाडला मिळालेल्या ‘ऍक्टिव्हिटी टास्क’मध्ये गुण मिळवता न आल्याने सदगीरला एक गुण मिळाला. त्यानंतर सदगीरने सलग दोन गुण मिळवत 4-1 अशी आघाडी घेतली. शेवटच्या टप्प्यात सदगीर बाहेर गेल्याने गायकवाडला एक गुण मिळाला, मात्र अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सदगीरने 4-2 असा विजय(Maharashtra Kesari 2026 ) मिळवला.

याआधी माती विभागातील अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा 3-0 असा पराभव करत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलला एकतर्फी 10-0 ने हरवत अंतिम फेरी गाठली (Maharashtra Kesari 2026 )होती.

या दोन्ही गटांतील विजेते आमनेसामने आल्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सदगीरने आपली ताकद सिद्ध करत महाराष्ट्र केसरीचा किताब(Maharashtra Kesari 2026 ) पटकावला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00