Home तंत्रज्ञान MLA Mahesh Landge:उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प दृष्टीक्षेपात

MLA Mahesh Landge:उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प दृष्टीक्षेपात

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; पीएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीसह वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या संवर्धन व स्वच्छतेसाठीचा महत्त्वाकांक्षी नदी सुधार प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून भाजपा आमदार महेश लांडगे यांची भूमिका निर्णायक ठरली(MLA Mahesh Landge) आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी ५२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) पवना व इंद्रायणी नद्यांच्या संवर्धनासाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या विविध निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत उगम ते संगम दोन्ही नद्यांच्या किनारी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), मलनि:सारण व्यवस्था, प्रदूषण नियंत्रण तसेच नदी पुनरुज्जीवनाची कामे(MLA Mahesh Landge) प्रस्तावित आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी “नमामी इंद्रायणी” आणि पवना नदी सुधार प्रकल्पाचा विषय सातत्याने शासन दरबारी मांडत प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाला गती (MLA Mahesh Landge)दिली.

विशेष म्हणजे, पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करून सुधारित डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आला(MLA Mahesh Landge) आहे.

 

“नदी संवर्धन हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून, सर्वांनी एकत्र येऊन नदी पुनरुज्जीवनासाठी काम करण्याची गरज आहे,” अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी यापूर्वीच मांडली होती. विधानसभा अधिवेशनांतून सरकारचे लक्ष वेधल्यामुळे उगम ते संगम पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीनही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांमध्ये आशा निर्माण (MLA Mahesh Landge)झाली आहे.

पवना आणि इंद्रायणी या केवळ नद्या नसून, पिंपरी-चिंचवडच्या जीवनरेषा आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता हा राजकीय विषय नसून येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्याचा आणि शहराच्या शाश्वत भवितव्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, शासनाच्या सहकार्याने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या सहभागातून हा उगम ते संगम नदी सुधार प्रकल्प पीसीएमसी, पीएमसी आणि पीएमआरडीए यांच्या माध्यमातून निर्धारित वेळेत प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध (MLA Mahesh Landge)आहोत.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00