Home तंत्रज्ञान MLA Shankar Jagtap:वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सात ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चरचा प्रस्ताव – आमदार शंकर जगताप

MLA Shankar Jagtap:वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सात ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चरचा प्रस्ताव – आमदार शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडमधील वाकड ते मामुर्डी भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सात ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर उभारण्याचा प्रस्ताव आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड ते मामुर्डी दरम्यान वाढलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी ठोस पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (पुणे पश्चिम बायपास) वरील या भागात वाहतूक अधिक सुकर करण्यासाठी सात महत्त्वाच्या ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर अर्थात अंडरपास उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी(MLA Shankar Jagtap) यांच्याकडे मांडला आहे.

 

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रविवारी (दि. 14) आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. वाकड ते मामुर्डी या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण, औद्योगिक विस्तार, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, निवासी व व्यापारी टाउनशिप उभ्या राहिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा भार लक्षणीयरीत्या वाढला आहे. मात्र, रस्त्यांची मर्यादित क्षमता आणि अपुऱ्या ग्रेड सेपरेशनमुळे महामार्ग व स्थानिक वाहतूक एकमेकांत मिसळून तीव्र कोंडी निर्माण होत असल्याचे जगताप यांनी निदर्शनास (MLA Shankar Jagtap)आणून दिले.

 

या पार्श्वभूमीवर सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी या सात ठिकाणी नवीन बॉक्स स्ट्रक्चर उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. या माध्यमातून महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचे क्रॉसिंग सुकर होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार जगताप यांनी स्पष्ट(MLA Shankar Jagtap) केले.

 

यापूर्वी वाकड ते मामुर्डी या परिसरातील सेवा रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले असून, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपासवर बॉक्स पुशअप पद्धतीने कामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच प्रस्तावित सात नवीन अंडरपास पूर्ण झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी( MLA Shankar Jagtap)सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 हा आयटी हब, औद्योगिक पट्टा, शैक्षणिक संकुले, रुग्णालये, निवासी व व्यापारी क्षेत्र तसेच ऑटोमोबाईल उद्योगातून जाणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पुनावळे, बाणेर, बालेवाडी, वाकड, हिंजवडी, किवळे आणि रावेत या गर्दीच्या भागांतून हा महामार्ग जात असल्याने येथे अतिरिक्त वाहतूक पर्यायांची उभारणी करणे अपरिहार्य झाले आहे, असे आमदार शंकर जगताप(MLA Shankar Jagtap) यांनी स्पष्ट केले.

वाढत्या वाहतुकीचा दीर्घकालीन विचार करून सेवा रस्त्यांना प्राधान्य देणे, अतिक्रमण हटवणे आणि आधुनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे ही आपली भूमिका असल्याचेही जगताप यांनी सांगितले. प्रस्तावित बॉक्स स्ट्रक्चरमुळे वाकड ते मामुर्डी हा संपूर्ण भाग वाहतूक कोंडीमुक्त होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास त्यांनी(MLA Shankar Jagtap)व्यक्त केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00