पिंपरी-चिंचवड : निसर्ग कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या साध्या पण प्रभावी काव्यातून स्त्रियांच्या जीवनातील वास्तव मांडत समाजप्रबोधन केले. “नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे…” अशा ओळींमधून त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र, बहिणाबाईंना उमगलेले हे जीवनतत्त्व आजच्या विज्ञानयुगातील काही महिलांना अजूनही समजलेले नाही, अशी खंत इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी व्यक्त (Bahinabai Chaudhari) केली.
त्या थेरगाव येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पालक व शिक्षकांसमोर प्रबोधनपर मार्गदर्शन करताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित भोंदूबाबा प्रकरणाचा उल्लेख करत ती घटना अत्यंत लाजिरवाणी असल्याचे (Bahinabai Chaudhari)म्हटले.
इंगळे पुढे म्हणाल्या, “ज्या महिलांनी इतर महिलांना न्याय मिळवून द्यायचा, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहायचे, त्याच जर अंधश्रद्धेच्या आहारी जात असतील, तर ते समाजासाठी घातक आहे. अशा कृतींमुळे स्त्री शिक्षणाचा व प्रगतीचा हेतूच प्रश्नांकित(Bahinabai Chaudhari) होतो.”
स्त्रियांमध्ये असलेल्या बहुगुणी क्षमतेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “स्त्रिया मल्टीटास्किंग असतात. त्या एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. मात्र त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा अंधश्रद्धेला बळी पडू नये. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून पुढे (Bahinabai Chaudhari) जावे.”
कार्यक्रमात प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, लेखनिक नलिनी पंडित, सुनिता घोडे, अंजली सुमंत, सारिका देसाई, योगेश्वरी जाधव यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. मनिषा समर्थ यांनीही महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा सल्ला (Bahinabai Chaudhari) दिला.
यावेळी विद्यार्थिनींनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे औचित्य साधून बालवाडी व माध्यमिक विभागातील माता-पालकांचा तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीतर्फे कार्यक्रमाचे प्रायोजकत्व करण्यात आले होते. उपस्थित पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. बालवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात(Bahinabai Chaudhari) आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा वाघ यांनी केले, प्रास्ताविक व परिचय मृदुल साने यांनी केला, तर आभार प्रदर्शन अंजली सुमंत यांनी (Bahinabai Chaudhari) केले.
