Home आरोग्य Pcmc Heavy Rain:वादळी पावसाचा तडाखा : वाल्हेकरवाडी, भोसरी, मोशीसह अनेक ठिकाणी झाडे कोसळली; मारुंजीतही झाड पडल्याची घटना

Pcmc Heavy Rain:वादळी पावसाचा तडाखा : वाल्हेकरवाडी, भोसरी, मोशीसह अनेक ठिकाणी झाडे कोसळली; मारुंजीतही झाड पडल्याची घटना

पिंपरी-चिंचवड शहरात वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वाल्हेकरवाडी, भोसरी, मोशी आणि मारुंजी परिसरात झाडे कोसळली. वाहनांचे नुकसान झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दुपारी अचानक झालेल्या वादळी पावसाने आणि जोरदार वाऱ्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील विविध भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली (Pcmc Heavy Rain) नाही.

 

वाल्हेकरवाडी परिसरात मोठे झाड वाहनांवर कोसळल्याने काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू (Pcmc Heavy Rain)केले.

 

दरम्यान, भोसरी आणि मोशी परिसरात दोन ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. स्थानिक नागरिक, अग्निशमन विभाग आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात (Pcmc Heavy Rain)आली.

 

मारुंजी परिसरातही जोरदार वाऱ्यामुळे झाड कोसळल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाल्याने शहरातील अनेक भागांत अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी (Pcmc Heavy Rain)लावली.

 

महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वारे आणि पावसाच्या काळात झाडांखाली, जुन्या इमारतींजवळ किंवा उघड्या जागेत उभे राहू नये, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले (Pcmc Heavy Rain)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00