(विशेष प्रासंगिक, विवेक कुलकर्णी )दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आणि कॅन्टोन्मेंटमधील श्री विहार, सिद्धिविनायक नगरी व परिसर अक्षरशः जलमय झाला. रस्ते दिसेनासे झाले, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, महागड्या गाड्या पाण्यात बुडाल्या, नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले… पण या सगळ्याने कुणाला काही फरक पडतोय (Shri Vihar Waterlogging)का?
काही दिवसांपूर्वीपर्यंत “पाऊस येत नाही, दुष्काळ पडेल” म्हणून आक्रोश सुरू होता. बहुतेक तो आक्रोश थेट स्वर्गापर्यंत पोहोचला असावा. नेहमीप्रमाणे क्रोधी असलेल्या इंद्रदेवांचा संयम सुटला आणि त्यांनी पावसाला असा आदेश दिला की, “जा… आता मनसोक्त बरस!” पाऊसही काही माणूस नव्हता की आदेश धुडकावेल. तो कोसळत राहिला… आणि इथे मात्र प्रशासनाचे नियोजन वाहून (Shri Vihar Waterlogging)गेले.
पण खरी गंमत तर कॅन्टोन्मेंट प्रशासनाची आहे.
मालमत्ता कर वसूल करायचा असेल तर श्री विहार, सिद्धिविनायक नगरी आणि परिसर त्यांच्या हद्दीत येतो. कर भरण्यासाठी नोटिसा वेळेवर येतात, दंड आकारला जातो. मात्र पावसाळ्यात रस्ते तळे बनले, पाण्याचा निचरा झाला नाही, नागरिक अडकले, वाहनांचे नुकसान झाले, घरात पाणी शिरले… तेव्हा हीच यंत्रणा कुठे गायब(Shri Vihar Waterlogging) होते?

उलट उद्या कुणी म्हणेल, “तुमच्या सोसायटीत पाणी शिरलं, त्यात आमचा काय दोष? पार्किंगची व्यवस्था नव्हती तर महागड्या गाड्या का घेतल्या?” असा प्रश्न विचारायलाही काही जण मागेपुढे पाहणार (Shri Vihar Waterlogging)नाहीत.
पण प्रश्न गाडीचा नाही… प्रश्न करदात्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे.
नागरिक वर्षानुवर्षे कर भरतात तो केवळ पावती मिळवण्यासाठी नव्हे, तर मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून. पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, रस्ते सुरक्षित राहतील, आपत्तीच्या वेळी प्रशासन तत्परतेने धावून येईल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र प्रत्येक पावसात तीच परिस्थिती, तेच जलमय रस्ते आणि तेच प्रशासनाचे (Shri Vihar Waterlogging)मौन!
निसर्गावर कुणाचे नियंत्रण नसते, हे खरे. पण निसर्गाच्या संकटाला आपत्तीमध्ये रूपांतर होऊ न देणे, ही प्रशासनाची जबाबदारी असते. नियोजनाचा अभाव, नालेसफाईकडे दुर्लक्ष, पावसाळ्यापूर्वीची अपुरी तयारी आणि त्यानंतरची निष्क्रियता याची किंमत मात्र सामान्य नागरिकांना मोजावी (Shri Vihar Waterlogging)लागते.
आज श्री विहार जलमय झाला आहे. उद्या दुसरा परिसर होईल. प्रश्न एवढाच आहे की, प्रत्येक वेळी नागरिकच भरडले जाणार आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेणार (Shri Vihar Waterlogging)का?
कर वसूल करताना प्रशासनाला नागरिक आठवतात, पण संकटाच्या वेळी नागरिकांना प्रशासन शोधावे लागते, हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका(Shri Vihar Waterlogging) आहे.
कारण… पावसाचे पाणी कधीतरी ओसरेल; पण प्रशासनाच्या उदासीनतेचा पूर कधी (Shri Vihar Waterlogging)ओसरणार?
कर भरताना नागरिक एक दिवसही उशीर करत नाहीत, कारण उशीर झाला तर दंड असतो. पण वर्षानुवर्षे रखडलेल्या विकासकामांवर, बंद पडलेल्या निचरा व्यवस्थेवर आणि निष्क्रिय प्रशासनावर दंड कोण (Shri Vihar Waterlogging)आकारणार?
आज श्री विहार पाण्यात आहे… उद्या दुसरा परिसर असेल. पण जोपर्यंत नागरिकांच्या वेदनांपेक्षा फाईलवरील सही आणि फोटोसेशन महत्त्वाचे राहतील, तोपर्यंत “पाणीच पाणी चोहीकडे…” ही केवळ कविता राहणार नाही, तर प्रत्येक पावसाळ्यातील कटू वास्तव ठरणार (Shri Vihar Waterlogging)आहे.
“पाऊस पडला म्हणून पाणी साचलं नाही… पाणी साचलं कारण व्यवस्था वर्षानुवर्षे साचून बसली आहे.” — हा खरा मुद्दा(Shri Vihar Waterlogging) आहे.
