Home महाराष्ट्र Dehuroad Crime:देहूरोड येथे ६.७५ कोटींची फसवणूक; ठेकेदार संदीप ठाकूर अटकेत

Dehuroad Crime:देहूरोड येथे ६.७५ कोटींची फसवणूक; ठेकेदार संदीप ठाकूर अटकेत

देहूरोड येथील संदीप ठाकूर याला सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली ६.७५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

by Admin
Spread the love

देहूरोड, २४ फेब्रुवारी २०२६ : सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या कामाच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६.७५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देहूरोड येथील रहिवासी संदीप उर्फ सोनू उर्फ आदित्य चव्हाण उर्फ ठाकूर (वय ४०) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Dehuroad Crime) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पुणे महापालिकेत सांडपाणी वाहिनीचे कंत्राटी काम करत असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. नारायण पेठ परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला कामात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. ही फसवणूक २८ मार्च २०२४ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद (Dehuroad Crime)आहे.

फसवणुकीतून मिळालेल्या पैशांत आरोपीने विकासनगर परिसरात घर खरेदी केल्याची तसेच वाहनही घेतल्याची माहिती समोर आली आहे. समाजात प्रतिमा उंचावण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, पोस्टरबाजी आणि सामाजिक कार्यकर्त्याची प्रतिमा निर्माण करण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले (Dehuroad Crime)आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीसह आणखी चार जणांविरुद्धही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत (Dehuroad Crime)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00