Home मनोरंजन PCMC Kalakar Katta :कवीने शब्द जिवंत करावे – कलाकार कट्टा पुष्प ४ पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात

PCMC Kalakar Katta :कवीने शब्द जिवंत करावे – कलाकार कट्टा पुष्प ४ पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात

पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेतर्फे आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प ४’ कार्यक्रमात राज अहेरराव यांचे प्रेरणादायी विचार, हलगी वादन, शाहिरी, नाट्य व कविता सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

by Admin
Spread the love

पिंपरी, ता. १ मार्च : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प ४’ हा सांस्कृतिक कार्यक्रम चिंचवड येथील पंडित पद्माकर सभागृहात उत्साहात पार पडला. विविध कलाप्रकारांनी सजलेल्या या कार्यक्रमात साहित्य, लोककला, शाहिरी, नाट्य आणि गायनाचा सुरेल संगम अनुभवायला (PCMC Kalakar Katta)  मिळाला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “प्रत्येक साहित्यिक हा संतांचा वारसदार असतो. त्याला सुचलेले शब्द म्हणजे खाणीतून गवसलेला हिरा आहे. त्या शब्दांना सादरीकरणाच्या अंगाने पैलू पाडले, तरच ते जिवंत होऊन अनमोल ठरतात.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद(PCMC Kalakar Katta)  दिली.

‘लोककला’ सत्रात आसाराम कसबे यांनी हलगी या पारंपरिक वाद्याची ओळख करून दिली. अनिकेत कांबळे, गणेश पात्रे, प्रणव देडे आणि ऋषी गायकवाड यांनी हलगी वादनाचे प्रात्यक्षिक सादर करून वातावरण दणाणून सोडले. ‘शाहिरी’ सत्रात अनिकेत सोनकांबळे, असद शेख, राजरत्न पांडगळे आणि नमन कांबळे यांनी दमदार सादरीकरण करत टाळ्यांचा कडकडाट (PCMC Kalakar Katta) मिळवला.

कराओके गायनात सुभाष चव्हाण आणि शरद शेजवळ यांनी सुरेल गीते सादर केली. ‘नाट्य’ सत्रात गौरी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश सिद्धांत दरेकर, मनस्वी अत्रे आणि चिमुकली आर्या अत्रे यांनी नाट्यप्रवेश सादर करून उपस्थितांची मने (PCMC Kalakar Katta) जिंकली.

‘कविता’ सत्रात निलेश शेंबेकर, ह.भ.प. पुरुषोत्तम हिंगणकर आणि दिनेश भोसले यांनी आपल्या काव्यसादरीकरणाने दाद मिळवली, तर अभिवाचन राजेंद्र घावटे यांनी(PCMC Kalakar Katta)  केले.

कार्यक्रमाला शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, माधुरी ओक, उज्ज्वला केळकर, माई गटने, तुकाराम पाटील, प्रदीप गांधलीकर, अरुण कांबळे, जितेंद्र रॉय आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुहास जोशी, अश्विनी कुलकर्णी, किरण येवलेकर आणि राजू बंग यांनी केले. प्रस्तावना प्रकाश ढवळे यांनी तर सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी(PCMC Kalakar Katta)  केले.

‘कलाकार कट्टा’च्या या उपक्रमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळाले असून, सांस्कृतिक चळवळीला नवी उभारी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त(PCMC Kalakar Katta)  केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00