निगडी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 01 ने तडीपार आरोपीविरुद्ध कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 01 चे पथक हद्दीत रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींची तपासणी करत असताना पोलीस हवालदार सागर अवसरे (ब.क्र. 2809) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात (Crime Branch Unit 01) आली.
मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ अंकुश हळनोर (वय 30, रा. जय गणेश हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली, पुणे) यास मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 01, पिंपरी-चिंचवड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (1)(ब) अन्वये आदेश क्र. 05/2026 दि. 07 जानेवारी 2026 रोजी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले (Crime Branch Unit 01) होते.
मात्र संबंधित आरोपीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला. दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. सुमारे 5.40 वाजण्याच्या सुमारास एल. जे. ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर, प्लॉट क्र. 52, सेक्टर क्र. 23, ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे तो आढळून (Crime Branch Unit 1)आला.
याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 142 अन्वये निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे.गुन्हे शाखा युनिट 01 च्या या कारवाईमुळे तडीपार आरोपींवर वचक बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी (Crime Branch Unit 01) सांगितले.
