निगडी : दुर्गा टेकडी येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी “युगप्रवर्तक छत्रपती शिवराय” या विषयावर शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित (Shiv Jayanti Nigdi) केले.
घावटे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेत सार्वभौम लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला. स्वत्व आणि स्वाभिमानाची पेरणी करत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एतद्देशीय रयतेचे राज्य निर्माण केले. अन्याय, अत्याचार आणि अनाचार यांपासून जनतेची मुक्तता करून लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली. आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार करत समाजातील पराभूत मानसिकता बदलली आणि इतिहासाच्या प्रवाहालाच नवी दिशा (Shiv Jayanti Nigdi )दिली.”
ते पुढे म्हणाले, “स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या निर्धाराचे प्रतीक आहे. शिवराज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील अलौकिक घटना असून राज्याभिषेकानंतर शिवराय ‘छत्रपती’ झाले आणि हिंदवी स्वराज्याला सर्वदूर मान्यता मिळाली. नवीन कालगणना, नाणी, अष्टप्रधान मंडळ आणि लोकाभिमुख प्रशासनामुळे राज्यव्यवस्थेला विशेष बळ(Shiv Jayanti Nigdi )मिळाले.”
कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते अध्यक्षस्थानी (Shiv Jayanti Nigdi)होते.
सुप्रभात मित्र परिवार, सूर्यनमस्कार ग्रुप, जय हरी ग्रुप आणि सूर्योदय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रातःकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राजेंद्र बाबर, देविदास ढमे, रवींद्र मोहिते, भरत देशमुख, रघुनाथ रोकडे, मल्लिकार्जुन, दत्ता गोंजारी, कृष्णा साळवे, विलास कुऱ्हाडे, गजानन ढमाले, भगवान पठारे, सुभाष पागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांचा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात (Shiv Jayanti Nigdi)आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास ढमे यांनी केले. सूत्रसंचालनही त्यांनीच केले, तर रवींद्र मोहिते यांनी आभारप्रदर्शन केले. बाबा नायकवडी, शंकर राणे, कांशीराम भोसले, विजय शिंदे, सुरेश मुळूक आदींनी सहकार्य(Shiv Jayanti Nigdi )केले.
दुर्गा टेकडीवर रोज सकाळी येणारे नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
