पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२६ : रवि लांडगे, महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आज यशवंतराव चव्हाण स्मृती पदव्युत्तर संस्था व रुग्णालय (वायसीएम) येथे भेट देत विविध विभागांची सर्वंकष पाहणी (Ravi Landge) केली.
महापालिका क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठ्या आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या या रुग्णालयात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या उपचारप्रक्रिया, सुविधा, मनुष्यबळ आणि एकूण व्यवस्थेचा महापौरांनी प्रत्यक्ष आढावा (Ravi Landge)घेतला.
महापौरांनी आपत्कालीन विभाग, आयसीयू, जनरल व स्पेशालिटी वॉर्ड, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, फार्मसी, नोंदणी कक्ष तसेच वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित विभागांना भेट देऊन संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. उपचारांची गती, उपलब्ध वैद्यकीय उपकरणे, विद्यार्थी-डॉक्टर प्रशिक्षण प्रक्रिया आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची माहिती त्यांनी जाणून (Ravi Landge)घेतली.
यावेळी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामकाजातील आव्हाने, आवश्यक संसाधने आणि सेवा सुधारणा याबाबत महापौरांनी सूचना (Ravi Landge)केल्या.
रुग्णांशी थेट संवाद
पाहणीदरम्यान महापौरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधला. उपचारांची गुणवत्ता, स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि रुग्णालयातील वातावरणाबाबत त्यांनी अभिप्राय जाणून घेतला. अनेक रुग्णांनी वेळेत मिळणाऱ्या उपचारांबद्दल आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यभावाबद्दल समाधान व्यक्त केले, तर काहींनी सुधारणा अपेक्षित असलेल्या बाबी(Ravi Landge) मांडल्या.
या दौऱ्यात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, नोडल ऑफिसर डॉ. छाया शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित(Ravi Landge) होते.
“वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी समर्पणाने काम करत असून नागरिकांना योग्य व तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. नागरिकांना अत्युत्तम, वेगवान आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देणे हे आमचे प्राधान्य आहे. सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सेवांची गुणवत्ता सातत्याने उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड(Ravi Landge) महानगरपालिका
