Home माझं पिंपरी चिंचवड Abhishek Barne :आमदारांच्या दबावानंतर कोअर कमिटीची शिफारस बदलली; स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांना पसंती

Abhishek Barne :आमदारांच्या दबावानंतर कोअर कमिटीची शिफारस बदलली; स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांना पसंती

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कोअर कमिटीने संदीप कस्पटे यांची शिफारस केली होती. मात्र आमदारांच्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २५ – भारतीय जनता पक्ष (भाजप)ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ पैकी ८४ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असले, तरी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. महापौर निवडीप्रमाणेच स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीतही पडद्यामागील राजकीय घडामोडींची चर्चा रंगली (Abhishek Barne) आहे.

या पदासाठी संदीप कस्पटे आणि अभिषेक बारणे ही दोन नावे अंतिम टप्प्यात होती. पक्षाच्या कोअर कमिटीतील सात सदस्यांनी संदीप कस्पटे यांच्या नावाला पसंती देत शिफारस पुढे पाठवली होती. मात्र, आमदारांच्या भूमिकेनंतर हे समीकरण बदलले. अखेरीस Devendra Fadnavis यांच्या सूचनेनंतर अभिषेक बारणे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत समितीत भाजपचे बहुमत असल्याने बारणे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात (Abhishek Barne )आहे.

गटबाजीची पार्श्वभूमी

शहरातील भाजपमध्ये आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अमित गोरखे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे वेगवेगळे गट कार्यरत असल्याचे मानले जाते. महापौर निवडीवेळीही या गटांतील समन्वय आणि स्पर्धा प्रकर्षाने दिसून आली (Abhishek Barne) होती.

महापौर पदासाठी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. मात्र, विविध गटांतील समीकरणांमुळे तडजोडीचा पर्याय पुढे आला आणि रवी लांडगे यांच्या नावाला अंतिम मान्यता देण्यात आली. त्या वेळीही आमदारांच्या भूमिकेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली (Abhishek Barne)होती.

स्थायी समिती अध्यक्षपदाची रंगतदार निवड

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे आणि अभिषेक बारणे अशी नावे चर्चेत होती. प्रारंभी कोअर कमिटीने कस्पटे यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, आमदारांकडून अभिषेक बारणे यांच्या नावासाठी ठाम पाठपुरावा करण्यात (Abhishek Barne)आला.

प्रकरण पुन्हा मुख्यमंत्री स्तरावर गेले. पक्षातील समन्वय आणि स्थानिक आमदारांची भूमिका लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घडामोडींना वेग आला आणि अभिषेक बारणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे (Abhishek Barne)आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाची ही निवड भाजपमधील अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि नेतृत्वातील समतोल राखण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब मानली जात (Abhishek Barne)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00