पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३ मधील यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिक व जलतरणपटूंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तलावातील पाणी न बदलल्यामुळे ते हिरवे झाले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत(Yamunanagar Pool) आहे.
मागील वर्षी स्थापत्य विभागाने लाखो रुपये खर्च करून तलाव सुरू केला होता; मात्र काही दिवसांतच तो पुन्हा बंद करण्यात आला. नुकत्याच नेमणूक झालेल्या H2O एजन्सी या ठेकेदाराकडून वार्षिक पास देण्यात आले होते; परंतु मुदत संपण्यापूर्वीच तलाव बंद करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तलाव तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली (Yamunanagar Pool)आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त पाटील यांना निवेदन देण्यात आले. मनोज लांडगे, दत्ता देवतरासे व मुजू आदी उपस्थित होते. पुढील १५ ते २० दिवसांत तलाव सुरू करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहे. अन्यथा मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला (Yamunanagar Pool)आहे .
