Home प्रेरणा / यशकथा Durgadevi Park :दुर्गादेवी उद्यान नामांतर वाद: ‘गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ प्रस्तावाला विरोध

Durgadevi Park :दुर्गादेवी उद्यान नामांतर वाद: ‘गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ प्रस्तावाला विरोध

पिंपरी-चिंचवडमधील इंदिरा गांधी (दुर्गादेवी) उद्यान चे नाव बदलून गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क करण्याच्या प्रस्तावावरून वाद पेटला आहे. महापौर रवी लांडगे यांच्या हालचालींवर एनएसयूआयचे ॲड. उमेश खंदारे यांचा तीव्र विरोध.

by Admin
Spread the love

पिंपरी : दुर्गा टेकडी येथील इंदिरा गांधी (दुर्गादेवी) उद्यान या उद्यानाचे नाव बदलून ‘गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ करण्याच्या हालचालींमुळे शहरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या प्रस्तावाला एनएसयूआयचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश राम खंदारे यांनी तीव्र विरोध दर्शविला (Durgadevi Park) आहे.

शहराचे महापौर रवी लांडगे यांच्या स्तरावर नामांतराची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उद्यानाला ‘गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात (Durgadevi Park)आहे.

यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना ॲड. खंदारे म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. मात्र त्यांच्या नावाने एखादा नवीन आणि लोकोपयोगी प्रकल्प सुरू करावा. त्यामुळे शहरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. केवळ विद्यमान उद्यानाचे नाव बदलण्यात कोणताही ठोस विकास साध्य होणार (Durgadevi Park)  नाही.”

तसेच, “दुर्गा टेकडी येथील इंदिरा गांधी उद्यानाचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. शहराच्या तरुण महापौरांकडून रोजगारनिर्मिती आणि विकासकामांबाबत मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद (Durgadevi Park) केले.

दरम्यान, या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिकेकडून अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतर या वादाला आणखी तीव्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात (Durgadevi Park) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00