पिंपरी : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुर्गा टेकडी येथील इंदिरा गांधी (दुर्गादेवी) उद्यान परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ उभारण्याचा संकल्प महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला (Gopinath Munde Memory) आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष प्रेम होते. पुण्यात आल्यानंतर ते शहरात येऊन कार्यकर्त्यांची विचारपूस करत असत. त्यांच्या कार्यशैलीत प्रत्येक कार्यकर्त्याशी जिव्हाळ्याचे नाते होते, अशी आठवण यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि शहराला हरित व पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी हा प्रकल्प साकारण्याचा मानस असल्याचे सांगण्यात(Gopinath Munde Memory) आले.
या अनुषंगाने महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. दुर्गा टेकडी परिसरातील सुमारे ८५ एकर जागेत ऑक्सिजन पार्क उभारण्याबरोबरच शहरातील सुमारे २०३ उद्यानांमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचीही भूमिका मांडण्यात (Gopinath Munde Memory)आली.
तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीमध्ये सांडपाणी व रासायनिक द्रव्ये सोडणाऱ्या कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी करण्यात Gopinath Munde Memoryआली.
या सर्व प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. “पर्यावरणाचे रक्षण म्हणजे पुढील पिढीच्या भविष्याचे संरक्षण,” असा संदेश यावेळी देण्यातGopinath Munde Memory आला.
