Home मनोरंजन Yahoo Shammi Kapoor :चला चला जाऊ सिनेमाला… याss हूss! शम्मी कपूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘याहू’ क्रांती लेखमाला : चला चला जाऊ सिनेमाला लेखक : सुरेश कंक

Yahoo Shammi Kapoor :चला चला जाऊ सिनेमाला… याss हूss! शम्मी कपूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘याहू’ क्रांती लेखमाला : चला चला जाऊ सिनेमाला लेखक : सुरेश कंक

शम्मी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेम, संगीत आणि नृत्याची नवी क्रांती घडवली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपासून मोहम्मद रफी आणि शंकर-जयकिशन यांच्या सुवर्णकाळाचा विशेष आढावा.

by Admin
Spread the love

(सुरेश कंक )हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांना तीन सुपुत्र — राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर. या तिन्ही भावांनी हिंदी सिनेसृष्टीवर आपली स्वतंत्र छाप उमटवली. त्यापैकी शम्मी कपूर यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने प्रेम, संगीत आणि नृत्य यांची एक नवी सिनेमाई भाषा निर्माण (Yahoo Shammi Kapoor ) केली.

 

आजच्या लेखात आपण पाहणार आहोत शम्मी कपूर यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीतील तो सुवर्णकाळ, ज्याने हिंदी सिनेमाचे रूपच बदलून (Yahoo Shammi Kapoor )टाकले.

 

प्रेमाचा अबोल काळ आणि शम्मी कपूर यांची एंट्री

१९४५ ते १९५५ या दशकातील चित्रपट त्या काळानुसार उत्कृष्ट होते. प्रेमकथा होत्या, विरह होता, भावना होत्या; मात्र प्रेम व्यक्त करण्याची एक ठराविक मर्यादा होती. नायक-नायिका अंतर राखून संवाद साधत, नजरेतून प्रेम व्यक्त करत. विरहगीत आणि हळुवार प्रेमगीतांचा तो काळ (Yahoo Shammi Kapoor ) होता.

परंतु हिंदी सिनेमाचा हा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला तो शम्मी कपूर यांच्या आगमनाने!शम्मी कपूर यांनी पडद्यावर धसमुसळा रोमान्स आणला. प्रेमाला नृत्याची, मस्तीची, उर्जेची जोड दिली. त्यांच्या अभिनयासोबत संगीतकार आणि गीतकारांनी अशी अफलातून गाणी निर्माण केली की संपूर्ण तरुणाई त्या लाटेत वाहून (Yahoo Shammi Kapoor ) गेली.

आणि मग एक दिवस हिमालयाच्या बर्फात मोहम्मद रफी यांच्या आवाजात ती आरोळी घुमली —

“याहूssss!”  हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या युगाची सुरुवात (Yahoo Shammi Kapoor ) झाली.

 

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा नायक

 

“पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा” किंवा “राज कपूर यांचा भाऊ” एवढीच ओळख शम्मी कपूर यांना मान्य नव्हती. त्यांना स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करायची होती.त्यांनी पडद्यावर एक चुलबुला, बेधडक, प्रेमासाठी वेडा झालेला तरुण साकारला. प्रेमिकेभोवती फिरणारा, तिला छेडणारा, गाण्यांतून प्रेम व्यक्त करणारा हा नवा नायक त्या काळातील तरुणांच्या मनाचा बादशाह (Yahoo Shammi Kapoor ) बनला.

 

“मुझे कितना प्यार है तुमसे

अपने ही दिल से पूछो तुम…”

 

(दिल तेरा दीवाना)

 

“दिल तेरा दीवाना है सनम…”

 

अशी गाणी गात शम्मी कपूर यांनी रसिकांना अक्षरशः वेड (Yahoo Shammi Kapoor ) लावले.

 

जंगली’ आणि याहूची जादू

 

“चाहे कोई मुझे जंगली कहे…”

हे गाणे आणि त्यातील शम्मी कपूर यांची मुक्त, बेभान शैली आजही हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अजरामर आहे.सायराबानोसोबतच्या जंगली चित्रपटात त्यांनी तरुणाईला एक वेगळाच उत्साह (Yahoo Shammi Kapoor ) दिला.

 

“एहसान तेरा होगा मुझपर…”

“आईय्या करूं मैं क्या सुकू सुकू…”

 

ही गाणी प्रेम आणि मस्ती यांचा सुंदर संगम होती.

 

गाण्यांतून निर्माण झालेली लोकप्रियता

शम्मी कपूर यांच्या चित्रपटांमधील गाणी ही त्यांच्या यशाची मोठी ताकद होती.

 

“बार बार देखो हजार बार देखो…” (चायना टाऊन)

“यूँ तो हमने लाख हसीं देखे हैं…”

“छुपने वाले सामने आ…”

 

अशा गाण्यांनी त्या काळातील तरुण-तरुणी अक्षरशः भारावून (Yahoo Shammi Kapoor ) गेले.

 

चित्रपटगृहांमध्ये शम्मी कपूर यांचा सिनेमा लागला की गर्दी उसळत असे.

 

मोहम्मद रफी – शंकर जयकिशन – शम्मी कपूर : सुवर्णत्रयी

 

शम्मी कपूर यांच्या यशामागे मोहम्मद रफी यांचा आवाज, शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि शैलेंद्र-हसरत जयपुरी यांचे शब्द यांची जादू होती.

 

“लाल छडी मैदान खडी…” (जानवर)

“तुमसे अच्छा कौन है…”

 

ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

 

काश्मीर की कली’तील रोमँटिक जादू

 

ओ. पी. नय्यर यांच्या संगीताने सजलेला काश्मीर की कली हा चित्रपट म्हणजे रोमँटिक सिनेमाचा उत्सवच (Yahoo Shammi Kapoor ) होता.

 

“तारीफ करूं क्या उसकी…”

“सुभानअल्लाह हसीं चेहरा…”

“इशारों इशारों में दिल लेने वाले…”

“दिवाना हुआ बादल…”

 

शर्मिला टागोर आणि शम्मी कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून (Yahoo Shammi Kapoor ) गेली.

 

प्रोफेसर’ आणि भावनिक अभिनय

 

प्रोफेसर या चित्रपटात शम्मी कपूर यांनी रोमँटिक शैलीसोबत भावनिक अभिनयही दाखवून (Yahoo Shammi Kapoor ) दिला.

 

“आवाज देके हमें तुम बुलाओ…”

“ए गुलबदन…”

 

ही गाणी आजही रसिकांच्या स्मरणात (Yahoo Shammi Kapoor ) आहेत.

 

उजाला’ची आठवण

 

उजाला या चित्रपटात शम्मी कपूर आणि राजकुमार यांची जोडी होती. जुन्या काळातील चित्रपट पाहताना प्रेक्षकांचा सहभाग किती निरागस होता, याची एक आठवण आजही ताजी (Yahoo Shammi Kapoor ) आहे.

 

चित्रपटातील भांडणाच्या दृश्यात शंभर रुपयांच्या नोटेवरून वाद सुरू असताना थिएटरमधून एक प्रेक्षक ओरडला —

“अरे बाबांनो, नका भांडू… मी देतो पैसे!”

 

आणि संपूर्ण थिएटरमध्ये हास्याची लाट (Yahoo Shammi Kapoor ) पसरली.

गाण्यांमधून जिवंत राहिलेला नायक

 

शम्मी कपूर यांच्या चित्रपटांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गाणी. प्रत्येक चित्रपटात संगीत, नृत्य आणि प्रेम यांचे अप्रतिम मिश्रण (Yahoo Shammi Kapoor ) असे.

 

त्यांच्या शैलीला अनुरूप गाणी तयार केली जात. मोहम्मद रफी यांच्या आवाजाने त्या गाण्यांना अमरत्व (Yahoo Shammi Kapoor ) मिळाले.

 

आजही शम्मी कपूर यांचे गाणे लागले की पाय नकळत थिरकू लागतात आणि ओठांवर एकच आरोळी येते —

 

“याssss हूssss!”

 

पुढील भागात पाहूया — शंकर-जयकिशन यांच्या जागी दुसरे संगीतकार आले तेव्हा काय (Yahoo Shammi Kapoor ) घडले?

 

क्रमशः…

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00