Home पुणे jan Sanvad Sabha Cancel:जनसंवाद सभा रद्द : प्रारूप मतदार यादीवरील हरकती सुरू

jan Sanvad Sabha Cancel:जनसंवाद सभा रद्द : प्रारूप मतदार यादीवरील हरकती सुरू

प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना स्वीकारण्याचे काम सुरु असल्याने 24 नोव्हेंबरची जनसंवाद सभा रद्द. नागरिकांना 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती, सूचना आणि तक्रारी स्वीकारण्याचे कामकाज सुरू असल्यामुळे येत्या सोमवारी (२४ नोव्हेंबर) होणारी जनसंवाद सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ( jan Sanvad Sabha Cancel ) दिली.

नियोजित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांच्या याद्या प्रभागनिहाय विभागून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना या यादीवरील हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतचा  ( jan Sanvad Sabha Cancel )अवधी देण्यात आला आहे.

या कालावधीत नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचनांसाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये, तसेच मुख्यालय स्तरावर पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कामासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे कार्य महत्वाचे आणि कालमर्यादित असल्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी आयोजित जनसंवाद सभा रद्द करण्याचा  ( jan Sanvad Sabha Cancel )निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांशी संवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय तसेच विकासात्मक निर्णयांमध्ये नागरिकांच्या अपेक्षा प्रतिबिंबित करण्यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  ( jan Sanvad Sabha Cancel )जनसंवाद सभांचे आयोजन करते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00