Home महाराष्ट्र PCMC Election 2026:पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक : शेवटच्या रविवारची प्रचारधावपळ शिगेला

PCMC Election 2026:पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक : शेवटच्या रविवारची प्रचारधावपळ शिगेला

शेवटच्या रविवारी उमेदवारांची प्रचारासाठी जोरदार लगबग, मतदार भेटी आणि रात्रंदिवस सुरू असलेली धावपळ.

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी )पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता अवघे चारच दिवस उरले असून प्रचाराचा धुरळा अक्षरशः शिगेला पोहोचला आहे. आजचा रविवार हा या धावपळीतील शेवटचा रविवार ठरत असल्याने शहरातील प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांची लगबग आणि धावपळ अवर्णनीय स्वरूपाची पाहायला मिळत आहे.

विशेषतः नोकरी-व्यवसायात व्यस्त असणाऱ्या मतदारांना प्रत्यक्ष भेटण्याची आजची संधी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. येत्या काही दिवसांत प्रचारासाठी वेळ मिळणार नसल्याने “आजच भेटू, आजच पटवू” या निर्धाराने सर्वच उमेदवार सकाळपासून रस्त्यावर उतरले आहेत. घरोघरी भेटी, सोसायट्यांमधील संवाद, छोटे-मोठे कोपरा सभासद, तरुणांशी चर्चा, ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत उमेदवार आपली विकासाची दृष्टी, अनुभव आणि सक्षम नेतृत्वाची खात्री मतदारांना देताना दिसत आहेत.

दिवस तर गेला, पण प्रचार थांबण्याचे नाव नाही. रात्री उशिरापर्यंत बैठकांपासून ते कार्यकर्त्यांच्या सल्लामसलतीपर्यंत सर्वच उमेदवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. “आपणच का निवडून यायला हवे?”, “आपण काय वेगळे करू शकतो?” हे ठसवून सांगण्यासाठी आजचा संपूर्ण दिवस आणि रात्रही खर्च करण्याची तयारी प्रत्येकाची आहे.

एकूणच पिंपरी-चिंचवड मनपा में नगरसेवक चुने जाना है या ध्येयाने प्रेरित होऊन उमेदवारांची शेवटच्या टप्प्यातील धावपळ अधिकच तीव्र झाली असून, मतदारांनाही कोण सक्षम, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख आहे याचा अंतिम निर्णय घ्यायची हीच निर्णायक वेळ ठरत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00