Home क्रीडा Punawale Cricket:पुनावळे प्रीमियर लीग २०२६ : रायगड किंग्सचे विजेतेपदावर नाव कोरले

Punawale Cricket:पुनावळे प्रीमियर लीग २०२६ : रायगड किंग्सचे विजेतेपदावर नाव कोरले

राहुल काटे यांच्या संघाची दमदार कामगिरी; स्थानिक क्रिकेटला मिळाली नवी ऊर्जा

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड – पुनावळे परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या पुनावळे प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रायगड किंग्स संघाने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. संघमालक राहुल काटे यांच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळ सादर करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

अंतिम सामन्यात रायगड किंग्सने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट समन्वय साधत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. निर्णायक क्षणी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि संघभावना विजयासाठी महत्त्वाची ठरली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. पुनावळे प्रीमियर लीगमुळे स्थानिक क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, अनेक नवोदित खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली.

स्पर्धेत शिवनेरी चॅम्पियन्स, लोहगड हिरोज, सिंहगड लेजेंड्स, तिकोना पॉवर हिटर्स, पन्हाळा फायटर्स आणि तोरणा स्ट्रायकर्स या संघांनीही दमदार खेळ सादर करत स्पर्धेची रंगत वाढवली.

पुनावळे प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा स्थानिक क्रिकेटसाठी प्रेरणादायी ठरली असून, भविष्यातही अशा स्पर्धांमधून ग्रामीण व उपनगरातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संघमालक राहुलभाऊ काटे यांच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळ सादर करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

अंतिम सामन्यात रायगड किंग्सने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट समन्वय साधत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. निर्णायक क्षणी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि संघभावना विजयासाठी महत्त्वाची ठरली.

विजयानंतर संघमालक राहुलभाऊ काटे यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “हा विजय संपूर्ण संघाच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा परिणाम आहे. आम्ही पुढील स्पर्धांसाठीही सज्ज आहोत आणि स्थानिक क्रिकेटला आणखी उजाळा देण्यासाठी सातत्याने काम करत राहू.”

पुणावळे प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन संतोष ढवळे, शिवाजी बांदल, किशोर बांदल, सचिन काटे, अक्षय पांढरे, गीतेश बोरगे, श्री काटे,रत्नेश बोरगे आणि सचिन पांढरे यांनी केले होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00