Home आरोग्य Thergaon Pavana Pollution:थेरगाव केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पुन्हा फेसाळली; खासदारांच्या सूचनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Thergaon Pavana Pollution:थेरगाव केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पुन्हा फेसाळली; खासदारांच्या सूचनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

by Admin
Spread the love

पिंपरी प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीतून जलपुरवठा केला जातो. मात्र हीच नदी सातत्याने प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असून, थेरगाव येथील केजुबाई बंधाऱ्यावर आज (दि. 21) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर फेस साचल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी नदी प्रदूषणावरील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरीही प्रशासनाने या सूचनांकडे पुन्हा दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर (Thergaon Pavana Pollution) येत आहे.

 

थेरगाव बोट क्लब परिसरातील केजुबाई बंधाऱ्याजवळ नदीपात्रात पांढऱ्या फेसाची मोठी मात्रा आढळली. ही पहिली घटना नसून यापूर्वीही काही कंपन्यांकडून रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडल्याने अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कारवाई झाल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न दिसता पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली (Thergaon Pavana Pollution) आहे.

 

सांडपाण्यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने संबंधित कंपन्यांवर कोणती कठोर कारवाई केली जाते, याकडे आता  (Thergaon Pavana Pollution)नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

खासदारांच्या सूचनेनंतरही उपाययोजना अद्याप नाहीत

खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काही दिवसांपूर्वीच शहरातील पवना आणि इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असल्याची माहिती देत तातडीने ठोस उपाययोजना करण्यास सांगितले  (Thergaon Pavana Pollution) होते.

त्यांनी लक्ष वेधले होते की —नदीपात्रात राडारोडा टाकला जात आहे,

मैलामिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात आहे,

कोट्यवधी रुपये खर्च करूनही नदी सुधार प्रकल्पांमध्ये कोणतीही लक्षणीय सुधारणा होत नाही,

वाढते प्रदूषण ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करत (Thergaon Pavana Pollution) आहे.

 

 

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना खासदारांनी दिल्या होत्या. तरीही प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल न दिसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00