Home प्रेरणा / यशकथा Women Felicitation Moshi:महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगार व घरकामगार महिलांचा सन्मान सोहळा

Women Felicitation Moshi:महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगार व घरकामगार महिलांचा सन्मान सोहळा

by Admin
Spread the love

मोशी: भोसरी विधानसभेचे आमदार तसेच दिलखुलास व जनसंपर्कशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे श्री. महेशदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा एक आगळीवेगळी उपक्रमशील योजना राबविण्यात येत आहे. आमदारांच्या सामाजिक जाणिवेच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वर्षीचा वाढदिवस सफाई कामगार व घरकामगार महिलांना समर्पित करण्यात आला ( Women Felicitation Moshi) आहे.

 

समाजासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या माता-भगिनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि घराघरांत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी निःस्वार्थपणे परिश्रम घेतात. त्यांच्या कष्टांचे मोल समाजाने ओळखावे, त्यांच्याप्रती मान-सन्मान वाढावा, यासाठी वाढदिवसाच्या औचित्याने त्यांचा  (Women Felicitation Moshi)  सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा विशेष सन्मान सोहळा रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मोशी येथील बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक (रिव्हर रेसिडेन्सी जवळ) येथे होणार( Women Felicitation Moshi )आहे.

 

कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक उपक्रमांसह ‘रंग जल्लोष’, मोफत बाल जत्रा यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार व मराठी चित्रपटातील अभिनेत्रींचा मनमोहक कलाविष्कारही उपस्थितांसाठी आकर्षण ठरणार आहे.

लकी ड्रॉ — ऍक्टिवा आणि पैठणी

उपस्थित माता-भगिनींसाठी लकी ड्रॉद्वारे एक ऍक्टिवा गाडी तसेच पैठणी दिली जाणार असून, भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमाचे आयोजन सिल्वराईज ग्रुपचे डायरेक्टर श्री. संतोष सिताराम बारणे पाटील यांनी केले असून सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन (Women Felicitation Moshi )करण्यात आले आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00