Home माझं पिंपरी चिंचवड Rahul Kalate BJP Entry:भाजप प्रवेशासाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे मुंबईला रवाना;

Rahul Kalate BJP Entry:भाजप प्रवेशासाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे मुंबईला रवाना;

माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचा आज मुंबईत भाजप प्रवेश. रविंद्र चव्हाण, शंकर जगताप, शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत हाय व्होल्टेज प्रवेश. पिंपरी-चिंचवडची राजकीय गणिते बदलणा

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा हाय व्होल्टेज पक्षप्रवेश आज प्रत्यक्षात येणार असून, माजी नगरसेवक राहुल कलाटे हे भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत होणाऱ्या या अधिकृत पक्षप्रवेशाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप आणि भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची प्रमुख उपस्थिती असणार (Rahul Kalate BJP Entry )आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल कलाटे यांच्या पक्षबदलाबाबत जोरदार चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संपर्क झाल्यानंतरही कलाटे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या चर्चांना आणखी उधाण आले. याच पार्श्वभूमीवर आज होणारा भाजप प्रवेश हा केवळ पक्षप्रवेश न राहता पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील एक निर्णायक वळण ठरण्याची शक्यता वर्तवली  (Rahul Kalate BJP Entry)  जात आहे.

राजकीय गणिते बदलणार?

राहुल कलाटे हे पिंपरी-चिंचवडमधील प्रभावी नेतृत्व मानले जाते. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यास शहरातील सध्याची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी मोठे बळ ठरणार असल्याचे बोलले जात (Rahul Kalate BJP Entry)आहे.

अलीकडील पक्षांतरांचा संदर्भ

या प्रवेशाला आणखी महत्त्व येण्याचे कारण म्हणजे, याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 21 नगरसेवक भाजपात प्रवेश करून गेले आहेत. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकीकडे मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात येत असताना, तर दुसरीकडे भाजपमधील काही नेत्यांचे राष्ट्रवादीकडे जाणे—या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडचे राजकारण सध्या अत्यंत अस्थिर आणि चुरशीचे बनले (Rahul Kalate BJP Entry) आहे.

हाय व्होल्टेज प्रवेश

राहुल कलाटे यांचा आजचा भाजप प्रवेश हा त्यामुळेच हाय व्होल्टेज मानला जात असून, या एकाच प्रवेशामुळे अनेक प्रभागांतील समीकरणे बदलू शकतात. भाजपकडून या प्रवेशाकडे रणनीतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे, तर विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता (Rahul Kalate BJP Entry)आहे.

पुढील राजकीय हालचालींना वेग

आजच्या प्रवेशानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी कोणते नेते पक्षांतर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे शहराच्या राजकारणात नवे वळण येणार हे निश्चित असून, आगामी काळात याचे पडसाद महापालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येतील, असा अंदाज व्यक्त केला(Rahul Kalate BJP Entry) जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00