पिंपरी (प्रतिनिधी):प्रभाग क्रमांक १४, आकुर्डी येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या सततच्या वीज समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ॲक्शन मोडवर आले असून, त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रभागातील वीजपुरवठा तातडीने आणि कायमस्वरूपी सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात (Akurdi Power Issue )आले.
या बैठकीस नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका अरुणा लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, सागर पुंडे, रोशन जगताप, हिरामण काळभोर, मधव नेर्लेकर यांच्यासह महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर, उपअभियंता अशोक जाधव, कनिष्ठ अभियंता सोनाली शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित(Akurdi Power Issue ) होते.
मोहननगर, विठ्ठलवाडी, दत्तवाडी व आकुर्डी परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर बैठकीत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात(Akurdi Power Issue ) आली.
जय गणेश व्हिजन, सोनिगरा क्लासिक परिसरातील विद्युत केबल, विठ्ठलवाडी व दत्तवाडी येथील एलटी केबल, राम नर्सिंग होम ते नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या निवासस्थान परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच चिंचवड स्टेशन साईबाबा नगर व दवा बाजार परिसरातील वीजपुरवठा एमआयडीसीवरून न घेता आकुर्डी विभागातून जोडण्याचे निर्देश देण्यात (Akurdi Power Issue )आले.
डाली एंड समीर व संघवी कंपाउंड येथील ट्रान्सफॉर्मरचा वॉक-डाऊन सर्वे करून लोड योग्य प्रकारे वितरित झाला आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. फॉल्ट झाल्यानंतर अधिकारी व दुरुस्ती वाहन उशिरा पोहोचत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत, फॉल्ट होताच कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर राहावेत, अशी स्पष्ट सूचना नगरसेवकांनी (Akurdi Power Issue )केली.
मोहननगर येथील वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजनेच्या फीडरवर वरुण साई मंदिर परिसरात रिंग मेन युनिट (RMO) बसवणे, हर्षमय सोसायटीचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करणे, गाय-वासरू चौकातील केबल समस्या, तसेच श्रीमती लिलाबाई खिवसरा शाळेजवळील वारंवार पेट घेणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात(Akurdi Power Issue ) आल्या.
यासोबतच सर्वे नंबर १२६, १३५ व महात्मा फुले नगर परिसरातील सकाळी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, ओव्हरहेड केबल अंडरग्राउंड करणे व ट्रान्सफॉर्मरला जी.आय. शीट बसवण्याबाबतही मागणी करण्यात(Akurdi Power Issue ) आली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या महिन्याभरात कामे मार्गी लावून आकुर्डी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही(Akurdi Power Issue ) दिली.
