प्रतिनिधी:केशवनगर, चिंचवड येथील काकडे टाऊनशिप वसाहतीसमोर गेल्या तब्बल एक वर्षापासून अनधिकृतपणे घनकचरा, घाण, आरोग्यास हानिकारक माती, राडा-रोडा राजरोसपणे टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास असतानाही हा परिसर अक्षरशः डम्पिंग ग्राउंड बनला असून, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले (Illegal Dumping)आहेत.
स्थानिक रहिवासी यांनी या संदर्भात वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा आर्थिक हातभार असावा, अशी तीव्र शंका नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या बेकायदेशीर कचरा टाकण्यामुळे अनेक वेळा रहिवाशांचे आरोग्य बिघडले असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा (Illegal Dumping )लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी आज स्थानिक रहिवाशांसह घटनास्थळी भेट देऊन राडा-रोडा टाकणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांना जाब विचारला. यावेळी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत, हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी (Illegal Dumping) केली.
मधुकर बच्चे यांनी स्पष्ट इशारा दिला की,“जर पुढील चार ते पाच दिवसांत या ठिकाणी ठोस आणि दंडात्मक कारवाई झाली नाही, तर सर्व रहिवाशांच्या वतीने येथे अनोखे आंदोलन छेडले जाईल. हा प्रकार सुरू राहिल्यास नागरिकांचा उद्रेक अटळ (Illegal Dumping) आहे.”
नागरिकांनी तसेच मधुकर बच्चे यांनी महापालिकेचे आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन या ठिकाणी टाकलेला सर्व राडा-रोडा हटवावा, दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि भविष्यात येथे कोणतेही आरोग्यास हानिकारक काम होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली (Illegal Dumping) आहे.
या प्रकरणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला (Illegal Dumping) आहे.
