पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आले (PCMC BJP News)होते.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार-प्रसार समितीचे पिंपरी-चिंचवड शहर संयोजक व भाजप शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत, हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेपर्यंत योग्य व प्रभावी पद्धतीने पोहोचवण्याचे आवाहन(PCMC BJP News )केले.
या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट बबनराव डांगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशाच्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प पाहताना उपस्थितांमध्ये उत्सुकता व सकारात्मक अपेक्षा दिसून येत होत्या. युवक, शेतकरी, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी नवी आशा निर्माण करणारा हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने निर्णायक पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात(PCMC BJP News) आली.
यावेळी भाजप पिंपरी-चिंचवड शहर महामंत्री वैशाली खाडेय, मीडिया सेल प्रमुख सागर बिरारी, रोहिणी मांढरे, तसेच चार्टर्ड अकाउंटंट सीए बबन डांगले, सीए ज्योती वाघमोडे, सीए संतोष वळसनकर, सीए शैलेश बोरे, सीए अमोल इंगळे, सीए ईश्वर मणी, सीए अमोल बोरसे, सीए आदित्य मासुळकर, सीए राहुल तहलानी, सीए किशोर जसवानी, गायत्री तळेकर, महेश साळुंखे, सतपाल गोयल, युवराज लांडे, रवींद्र नांदूरकर, संजय परळीकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने(PCMC BJP News) उपस्थित होते.
दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत आपली वैयक्तिक प्रतिक्रिया व्यक्त करताना मधुकर बच्चे म्हणाले,
“केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला निश्चितच गती देणारा आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून विविध घटकांमध्ये योग्य असा समतोल साधलेला आहे. त्यामुळे यात कुठेही उणीव जाणवत नाही. या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरांतून निश्चितच कौतुक केले (PCMC BJP News) जाईल.”
