Home माझं पिंपरी चिंचवड Bagul Socialmedia Head:पिंपरी-चिंचवड BJYM: अभिजीत बागुल सोशल मीडिया शहराध्यक्ष म्हणून नियुक्त

Bagul Socialmedia Head:पिंपरी-चिंचवड BJYM: अभिजीत बागुल सोशल मीडिया शहराध्यक्ष म्हणून नियुक्त

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) पिंपरी-चिंचवड येथे मोठे संघटनात्मक बदल; अभिजीत अजित बागुल यांची सोशल मीडिया शहराध्यक्षपदी नियुक्ती. युवा शक्तीला डिजिटल माध्यमातून बळकटी देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय.

by Admin
Spread the love

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीत मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले असून, युवा शक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक बळ देण्यासाठी श्री. अभिजीत अजित बागुल यांची भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया शहराध्यक्षपदी निवड (Bagul Socialmedia Head) करण्यात आली आहे.

ही नियुक्ती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अनुप मोरे, चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरराव जगताप, शहर भाजप अध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, प्रदेश सचिव श्री. अजित कुलथे आणि युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दिनेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा, संघटन कौशल्य आणि सोशल मीडियावरील प्रभावी कार्यशैली लक्षात घेऊन श्री. अभिजीत बागुल यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी  (Bagul Socialmedia Head)सोपवण्यात आली आहे.

सोशल मीडियातून युवाशक्तीला नवे बळ
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे जनसंपर्काचे प्रभावी साधन बनले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी निर्णयांची माहिती युवा वर्गापर्यंत तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या पदाची भूमिका (Bagul Socialmedia Head) अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

श्री. अभिजीत बागुल हे गेल्या दहा वर्षांपासून पक्षासाठी सक्रियपणे काम करत आहेत. युवा वर्गामध्ये त्यांची चांगली लोकप्रियता असून, त्यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया विभागाला नवी ऊर्जा मिळेल, असा (Bagul Socialmedia Head) विश्वास व्यक्त केला जात आहे.

नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्ष श्री. अनुप मोरे, आमदार श्री. शंकरराव जगताप आणि शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांनी त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “आजच्या काळात तरुणांना जोडून घेण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. श्री. अभिजीत बागुल यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा सोशल मीडियावर पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडेल,” असे मतही त्यांनी(Bagul Socialmedia Head) व्यक्त केले.

या नियुक्तीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि विविध हितचिंतकांनी श्री. बागुल यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरही शुभेच्छा आणि अभिनंदन संदेशांचा अक्षरश: वर्षाव होत (Bagul Socialmedia Head)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00