Home प्रेरणा / यशकथा IFEA Award:ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांना दिल्लीचा IFEA पुरस्कार | साहित्य व कामगार चळवळीतील योगदान

IFEA Award:ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांना दिल्लीचा IFEA पुरस्कार | साहित्य व कामगार चळवळीतील योगदान

पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगार नेते अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांना साहित्य, इतिहास आणि कामगार चळवळीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नवी दिल्ली येथील IFEA प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. Meta Keywords

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:साहित्य आणि कामगार चळवळीतील योगदानामुळे ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांना दिल्लीचा ‘आयफिया’ (IFEA) पुरस्कार जाहीर झाला आहे.पिंपरी-चिंचवड शहराच्या साहित्य, इतिहास आणि विशेषतः कामगार चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन असोसिएशन फॉर अवेरनेस ऑफ अप्लाइड रिसर्च, नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावरील ‘आयकॉनिक फेलिसिटेशन ऑफ एक्सेम्प्लरी अचिव्हमेंट’ हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना (IFEA Award) बहाल करण्यात येत आहे.

कामगार चळवळीतले योगदान
बोऱ्हाडे यांचे कामगार चळवळीतले कार्य पंचवीस वर्षांहून अधिक काळाचे आहे. १९९२ मध्ये इलेक्ट्रोसॉफ्ट वर्कर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या कामगार संघर्षाची सुरुवात झाली. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कामगार संघटनेतील त्यांचे नेतृत्व विशेष गाजले. २००३ मधील एच. ए. कंपनीसाठीच्या त्यांच्या लढ्याने राष्ट्रीय पातळीवर चर्चेला सुरुवात झाली. सेंच्युरी एन्का, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स अशा अनेक उद्योगांतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखालील चळवळीवर जमशेदपूर येथे प्रबंधही लिहिला गेला आहे. त्यांच्या पुढाकाराने २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये संघटित व असंघटित कामगारांची पहिली कामगार परिषद आयोजित झाली. या परिषदेत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील (IT) कामगारांच्या प्रश्नांवर  (IFEA Award)चर्चेची ठळक नोंद झाली आणि त्याचे पडसाद संसदेतही उमटले.

साहित्य आणि इतिहास क्षेत्रातील कार्य
साहित्य क्षेत्रात बोऱ्हाडे यांचे योगदान तितकेच उल्लेखनीय आहे. १९८९ ते १९९९ या दशकात ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवडचे कार्यवाह होते. १९९२ मध्ये त्यांनी कामगार साहित्य परिषद स्थापन करून तिचे अध्यक्षपद भूषविले. इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना करून त्यांनी मोशी येथे चार साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले. त्यांच्या सोळा पुस्तके प्रकाशित झाली असून ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी २०० हून अधिक गडकिल्ल्यांचा अभ्यास केलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेवरील (IFEA Award) त्यांच्या संशोधनातून ‘जिंजी, वेल्लोर, तंजावर’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे.

अभ्यासू, समर्पित आणि बहुआयामी कार्य करणाऱ्या अरुण बोऱ्हाडे यांच्या या सर्वसमावेशक योगदानाच्या मान्यतेस्वरूप त्यांना नवी दिल्ली येथे विशेष समारंभात हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार (IFEA Award)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00