Home संस्कृती Vinita Ainapure:ज्येष्ठ लेखिका विनिता जयंत ऐनापुरे यांचे निधन | मराठी साहित्यविश्वाची अपरिमीत हानी

Vinita Ainapure:ज्येष्ठ लेखिका विनिता जयंत ऐनापुरे यांचे निधन | मराठी साहित्यविश्वाची अपरिमीत हानी

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :ज्येष्ठ लेखिका विनिता जयंत ऐनापुरे (८३) यांचे दिनांक एक डिसेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत दोन डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता(Vinita Ainapure ) होणार आहेत

 

मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका, कथाकार तथा कादंबरीकार विनिता जयंत ऐनापुरे (वय ८३) यांचे एक डिसेंबर 2025 रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि सातत्याने लेखन करणारी व्यक्तीमत्व हरपल्याची भावना (Vinita Ainapure) साहित्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

 

विनिता ऐनापुरे यांनी कथासंग्रह, कादंबऱ्या, तसेच विविध विषयांवरील लेखनातून मराठी साहित्याला समृद्ध केले. त्यांच्या ‘तिच्या कथा’ या कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कारासह अनेक मान्यताप्राप्त संस्थांकडून गौरव प्राप्त झाला होता. ‘विणा’, ‘पदरी आण् आभाळ’, ‘नारायण’, ‘जननिवारी’ अशा त्यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर ठसा उमटवला. कथालेखनातील वैविध्यपूर्ण शैली, भाषेचा ओघवता वापर आणि व्यक्तिरेखांचे सूक्ष्म चित्रण ही ऐनापुरे यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये(Vinita Ainapure) होती.

 

लेखनासोबतच नाटक व साहित्यविषयक उपक्रमांतही त्यांची सक्रिय सहभागिता होती. ‘नारायण’ कादंबरीवर आधारित ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने  रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी(Vinita Ainapure) केली होती.

अंत्यसंस्कार २ डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत होणार असून, त्यांच्या पार्थिवदर्शनासाठी सकाळी आठ वाजल्यापासून व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या विनिता ऐनापुरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात(Vinita Ainapure) आहे


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00