Home गुन्हे IT Park Incident:हिंजवडी आयटी पार्क अपघात: बसच्या धडकेत दोन लहानग्यांचा मृत्यू

IT Park Incident:हिंजवडी आयटी पार्क अपघात: बसच्या धडकेत दोन लहानग्यांचा मृत्यू

हिंजवडी आयटी पार्क परिसरात भरधाव बस फुटपाथवर चढल्याने दोन शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. मद्यधुंद चालकामुळे झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव धावणारी बस थेट फुटपाथवर चढली आणि पायी जाणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन लहान शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले (IT Park Incident)आहेत.

मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ६) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश असून बसमधील काही प्रवासी किरकोळ (IT Park Incident) जखमी झाले आहेत.

ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड मार्गावर घडली. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस अतिवेगात असून चालक मद्यधुंद स्थितीत असल्याने त्याचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस थेट फुटपाथवर चढली आणि पायी जाणाऱ्या भावंडांना तसेच इतर पादचाऱ्यांना धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही मुलांचा घटनास्थळीच (IT Park Incident) मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व उपस्थित गर्दी हटवली. हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात हा गंभीर प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आला आहे. नागरिकांकडून “अशा घटना थांबणार कधी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात (IT Park Incident) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00