Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Divyang Bhavan:दिव्यांगांसाठी PCMC कटिबद्ध: राणीमाई पठारे यांचा दिव्यांग भवन दौरा

PCMC Divyang Bhavan:दिव्यांगांसाठी PCMC कटिबद्ध: राणीमाई पठारे यांचा दिव्यांग भवन दौरा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनचा सभापती राणीमाई पठारे यांनी आढावा घेतला. दिव्यांगांसाठी आरोग्य, पुनर्वसन आणि प्रशिक्षण सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :दिव्यांग नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई अशोक पठारे यांनी (PCMC Divyang Bhavan) केले.

‘दिव्यांग भवन’च्या कामाचा घेतल आढावा
पिंपरी (प्रतिनिधी) दि. २८ मार्च २०२६ : महानगरपालिकेच्या वतीने संचलित ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ला समितीच्या वतीने (दि.२७) सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान संस्थेच्या विविध उपक्रमांचा आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात (PCMC Divyang Bhavan)आला.

या वेळी माजी नगरसेविका श्रद्धाताई रवीभाऊ लांडगे, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित (PCMC Divyang Bhavan)होते.

सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर
सभापती राणीमाई पठारे आणि श्रद्धाताई लांडगे यांनी दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा, उपचार पद्धती, पुनर्वसन सुविधा आणि प्रशिक्षण उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. या सेवा अधिक दर्जेदार आणि परिणामकारक कशा करता येतील, याबाबत त्यांनी मार्गदर्शन(PCMC Divyang Bhavan) केले.

तसेच, दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी सेवा विस्तारावर विशेष भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात (PCMC Divyang Bhavan)आल्या.

महानगरपालिका विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि आवश्यक कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या भेटीमुळे ‘दिव्यांग भवन’च्या पुढील उपक्रमांना अधिक गती मिळणार असून, आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश सभापती राणीमाई पठारे यांनी (PCMC Divyang Bhavan)दिले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00