Home आरोग्य PCMC Drunk &Drive:पिंपरी चिंचवड Drunk Drive Case: 15 दिवसांचा कारावास, न्यायालयाचा कडक निर्णय

PCMC Drunk &Drive:पिंपरी चिंचवड Drunk Drive Case: 15 दिवसांचा कारावास, न्यायालयाचा कडक निर्णय

पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकाला न्यायालयाने 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्हविरोधातील मोहीम अधिक तीव्र.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या (ड्रंक अँड ड्राईव्ह) चालकांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एका दोषी चालकाला १५ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (PCMC Drunk & Drive)  आहे.

 

घटना नेमकी काय?

३१ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास (००:५३ वाजता) ३४ वर्षीय चालक आपली कार (क्रमांक MH 14 FM 1342) मद्यधुंद अवस्थेत अंकुशराव लांडगे सभागृह परिसरातून चालवत होता. भोसरी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस फौजदार दगडे यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ व १८४ अंतर्गत गुन्हा दाखल (PCMC Drunk & Drive )केला.

 

न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात झाली. २८ मार्च २०२६ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पाटील यांनी वैद्यकीय तपासणी अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरत आरोपीला दोषी(PCMC Drunk & Drive ) ठरवले.

 

न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

 

कलम १८५ अंतर्गत: १५ दिवस साधा कारावास आणि १०,००० रुपये दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त १० दिवसांचा (PCMC Drunk & Drive )कारावास.

 

कलम १८४ अंतर्गत: ३,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ५ दिवसांचा कारावास.

 

 

पोलिसांचे आवाहन

मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे अत्यंत धोकादायक असून, त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निष्काळजीपणापासून दूर राहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले (PCMC Drunk & Drive )आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00