Home गुन्हे Makrand Nikam :मकरंद निकम प्रकरण गाजतेय; आरोपांनंतर चौकशीची मागणी तीव्र

Makrand Nikam :मकरंद निकम प्रकरण गाजतेय; आरोपांनंतर चौकशीची मागणी तीव्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर गंभीर आरोप. आमदार सचिन अहिर यांचा सवाल; चौकशी व कारवाईची मागणी जोरात.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णयांवर आता राजकीय पातळीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी विधानभवनात हा मुद्दा उपस्थित करत सरकारला थेट जाब (Makrand Nikam) विचारला.

 

अहिर यांनी विचारले की, नगरसेवकांनी वारंवार चौकशीची मागणी करूनही निकम यांच्या कारभाराची सखोल चौकशी का करण्यात आली नाही? त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध निर्णयांबाबत गंभीर आरोप समोर आले असून त्याची दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी नमूद (Makrand Nikam)केले.

 

सभागृहात बोलताना त्यांनी कनिष्ठ अभियंता अमोल पडवळकर यांच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. बोगस शासकीय कागदपत्रांच्या आधारे कामे केल्याचा आरोप त्यांनी केला असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याची सध्या लातूर येथे बदली झाल्याचेही त्यांनी (Makrand Nikam)सांगितले.

 

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून मकरंद निकम यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी सचिन अहिर यांनी (Makrand Nikam)केली.

 

मुख्यमंत्र्यांना पत्रातून गंभीर आरोप

 

दरम्यान, या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले असून एका माजी नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निकम यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर गंभीर आरोप केले(Makrand Nikam) आहेत.

 

पत्रानुसार, त्यांच्या कार्यकाळात अनेक अनावश्यक व खर्चिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गेल्या नऊ वर्षांत सुमारे ४० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून, त्यातील अनेक कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. काही प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की नाहीत, याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली (Makrand Nikam)आहे.

 

तसेच, ठेकेदार, अधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला (Makrand Nikam)आहे.

 

आर्थिक बाबींवरही प्रश्न

 

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, ग्रीन बॉण्ड आणि म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. मात्र, यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर ताण निर्माण झाला असून, बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय सुमारे ४,५०० कोटी रुपयांचे आर्थिक दायित्व निर्माण झाल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले(Makrand Nikam) आहे.

 

चौकशीची मागणी 

 

या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील निर्णयांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय व प्रशासकीय हालचाली वाढण्याची शक्यता (Makrand Nikam)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00