शिरूर कासार (दि. २७ मार्च २०२६) : ग्रामीण भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन अत्यंत आवश्यक असून अशा उपक्रमांमधून भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन घडते, असे प्रतिपादन माजी आमदार तथा आठव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषाताई दराडे यांनी (Ekata Sahitya Sammelan) केले.
पाडळी येथे आयोजित आठव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. शिरूर कासारसारख्या ऊसतोड कामगार बहुल तालुक्यात एकता फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्य व संस्कृती रुजविण्याचे आणि जोपासण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यासाठी बुद्धिवंत आणि विचारवंतांनी अधिक बळ द्यावे, असेही त्यांनी आवाहन (Ekata Sahitya Sammelan) केले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच गहिनीनाथ पाखरे, माजी सरपंच रामदास हंगे, एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, केंद्रप्रमुख निवृत्ती बेदरे, लखुळ मुळे, पी. आर. खेडकर, रंजना फुंदे, लता कराड, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सानप, डॉ. स्नेहल सानप, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर आणि प्रदेश प्रवक्ते मल्हारी खेडकर आदी मान्यवर उपस्थित(Ekata Sahitya Sammelan) होते.
दोन दिवसीय संमेलनादरम्यान उषाताई दराडे यांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून सहभाग नोंदवला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर अधिक प्रभावी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाढत्या सामाजिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी संस्कारांची गरज असून, अशा साहित्य संमेलनांतून ते प्रभावीपणे दिले (Ekata Sahitya Sammelan) जातात.
ग्रामीण भागातील साहित्य हे वास्तव अनुभवांवर आधारित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातही अशा वास्तवाधारित साहित्याचा समावेश व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त (Ekata Sahitya Sammelan) केले.
यावेळी पाडळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत भूमिपुत्रांचा संमेलनाध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारोप सत्रात विविध ठराव मंजूर करण्यात (Ekata Sahitya Sammelan) आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवलिंग परळकर यांनी (Ekata Sahitya Sammelan) मानले.
