Home प्रेरणा / यशकथा Kalpana Bamb Book:विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘शब्दांशी जोडले नाते’ पुस्तकाचे प्रकाशन; वाचनसंस्कृतीला नवा आयाम

Kalpana Bamb Book:विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘शब्दांशी जोडले नाते’ पुस्तकाचे प्रकाशन; वाचनसंस्कृतीला नवा आयाम

पिंपरीतील न्यू इंग्लिश स्कूल, माण येथे ‘शब्दांशी जोडले नाते’ पुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन. वाचनसंस्कृती वाढवण्याचा अभिनव उपक्रम.

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी : प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, हा सोहळा विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडल्याने कार्यक्रमाला वेगळीच वैशिष्ट्यपूर्ण छटा (Kalpana Bamb Book) लाभली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता ११ वीतील कु. मिसबाह शफिक खान होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कु. रेश्मा राकेश प्रजापती (इयत्ता ११ वी) आणि कु. अर्पिता भाऊराव पवार (इयत्ता ९ वी) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित-दीक्षित, विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार आणि लेखिका कल्पना बंब व्यासपीठावर उपस्थित(Kalpana Bamb Book) होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात तुळशीपूजन, गणेश स्तवन आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविकात लेखिका कल्पना बंब यांनी आजच्या डिजिटल युगात कमी होत चाललेल्या वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हस्तेच प्रकाशन करण्यामागील संकल्पना ही वाचनसंस्कृतीला चालना देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट (Kalpana Bamb Book)केले.

अध्यक्षीय भाषणात कु. मिसबाह खान यांनी पुस्तकातील लेख समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकत वाचकांना अंतर्मुख करणारे असल्याचे सांगितले. मराठी साहित्याचा सुगंध घराघरांत आणि जगभर पोहोचावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त (Kalpana Bamb Book) केली.

 

कु. रेश्मा प्रजापती यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत, पुस्तके वाचल्याने विचार प्रगल्भ होतात आणि विद्यार्थी भविष्यात लेखक बनू शकतात, असे मत व्यक्त केले. तर कु. अर्पिता पवार यांनी पुस्तकातून सकारात्मक विचार, करुणा आणि जीवनमूल्यांची जाणीव समृद्ध होत असल्याचे (Kalpana Bamb Book) सांगितले.

 

कार्यक्रमात कवयित्री राधाबाई वाघमारे आणि कवी विलास कुंभार यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी संतसाहित्य अभ्यासक अशोक महाराज गोरे, सुरेश कंक, तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती(Kalpana Bamb Book) होती.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले, तर सुभाष चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात (Kalpana Bamb Book) आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00